शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:51 IST

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार पुरता ढेपाळला आहे. ‘लोकमत’ने जिल्हा सामान्य रुग्णालयाची खरेदीच बाबूगिरीच्या जाळ्यात’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी आज अचानक भेट देऊन आढावा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार पुरता ढेपाळला आहे. ‘लोकमत’ने जिल्हा सामान्य रुग्णालयाची खरेदीच बाबूगिरीच्या जाळ्यात’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी आज अचानक भेट देऊन आढावा घेतला. बांधकाम एका महिन्यात पूर्ण न केल्यास संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याच आदेशित केले आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रशासकीय अनागोंदीमुळे कारभार ढेपाळलेला आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांचे डॉक्टर अन् कर्मचारीही काहीच ऐकत नसल्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. त्यातच इमारतीचे बांधकामाची मुदतही संपूनही काम पूर्ण होत नसल्याने रुग्णांसह डॉक्टरांना मोठा त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे एका महिन्यात बांधकाम पूर्ण करुन देण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय, तशा तारखाही लिहून घेतल्या आहेत. या कालावधीत बांधकाम पूर्ण न झाल्यास संबंधित कंत्राटदारावर ३५३ कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन घेण्याच्याही सूचना पोलीस प्रशासनास दिल्या. संपूर्ण बांधकामाचा आढावा घेतला. तसेच सर्वच वॉर्डातील बाथरुमची पाहणी करून येत्या पंधरा दिवसांत दुरुस्ती करण्यास सांगितले. तर एका महिन्यात या इमारतीतील एकही काम शिल्लक राहणार नाही, याची काळजी घ्या. मजल्यावरील विविध विभागांची ओपीडी सुरू करण्यास सांगितले. तर औषधींच्याही प्रश्नावर लक्ष केंद्रित करुन शासनाच्या नियमानुसार औषधी खरेदी करण्याच्या सूचना दिल्या. रुग्णालयाच्या पाठीमागील सुलभ शौचालय सुरु करुन ते विनाशुल्क सुरु देण्यासही सांगितले. यावेळी कार्यकारी अभियंता देशपांडे, शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी, डॉ. मंगेश टेहरे, डॉ. गोपाल कदम आदींची उपस्थिती होती.पोलिसांत केली नोंद४येथील रुग्णालयाचे बांधकाम संथ गतीने करणाºया कंत्राटदारास ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी पोलिसांना सूचना दिल्या होत्या. परंतु येत्या पंधरा दिवसांत काम पूर्ण करुन देण्याची हमी कंत्राटदाराने दिल्याने तशी नोंदणी शहर पोलिसांत केल्याचे पोउपनि तान्हाजी चेरले यांनी सांगितले.