शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

इतर मागास महामंडळाची थकबाकी ३५ लाखांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 22:54 IST

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातर्फे कर्ज योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराकरिता अप्लव्याजदराने कर्ज वितरित करण्यात आलेले आहे. मात्र त्याची थकबाकी भरली जात नसून ३५.२४ लाखांवर थकबाकी गेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातर्फे कर्ज योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराकरिता अप्लव्याजदराने कर्ज वितरित करण्यात आलेले आहे. मात्र त्याची थकबाकी भरली जात नसून ३५.२४ लाखांवर थकबाकी गेली आहे.थकीत वसुलीबाबत सचिव विमुक्त जांती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग, कल्याण विभाग, मंत्रालय यांच्या दालनात बैठक झाली. त्यात हिंगोली जिल्ह्याचा आढावा घेतला असता एकूण ३५.२४ लक्ष रुपये इतकी असल्याने थकबाकी असल्याचे आढळून आले. त्यामुळे ही रक्कम लाभार्थी, किंवा त्यांचे जामीनदार हमीपत्र/पगारपत्रधारकाचे वेतनातून कपात करण्याचा आदेश दिला आहे. त्यातूनही काही निष्पन्न होत नसल्यास गहाणखत (कर्ज बोजा नोंद उतारे) इत्यादीच्या आधारे दिवाणी दावे, फौजदारी खटले, महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 मधील तरतुदीनुसार आर. आर. सी. इत्यादी अंतर्गत कारवाई करून वसुली करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत.त्यानुसार महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून कायदेशिर कार्यवाही करण्याचे कामकाज चालू झालेले आहे. यात थकबाकीदारांना ३१ मार्च, २0१८ पर्यंत थकीत व्याज रक्कमेवर २ टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्याचा लाभ घेऊन लाभार्थ्यांनी थकीत मुद्दल व व्याज रक्कम एकरक्कमी भरून व कायदेशीर कारवाई टाळावी, असे जिल्हा व्यवस्थापक अरुण एस. समुद्रे यांनी कळविले आहे.