शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

रॉकेल वाटप प्रकरणी चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 01:25 IST

तालुक्यातील नांदापूर येथे रॉकेल मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. त्याबाबत ‘लोकमतने’ १३ आॅगस्ट रोजी ‘रॉकेल मिळेना’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत तहसीलदारांनी नांदापूर व वारंगा फाटा येथील रॉकेल वाटप प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश मंडळ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : तालुक्यातील नांदापूर येथे रॉकेल मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. त्याबाबत ‘लोकमतने’ १३ आॅगस्ट रोजी ‘रॉकेल मिळेना’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत तहसीलदारांनी नांदापूर व वारंगा फाटा येथील रॉकेल वाटप प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश मंडळ अधिकाऱ्यांना दिले आहेत.नांदापूर येथे रॉकेल विक्रेत्याने आठ महिन्यापासून रॉकेल वितरीत केली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदाराकडे केली आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांना रॉकेलची अत्यंत गरज असते. रॉकेल का मिळत नाही असे नांदापूर येथील दुकानदारास विचारले असता वरुन रॉकेल पुरवठा होत नसल्याचे कारण १३ आॅगस्ट रोजी विक्रेत्याने सांगीतले होते. त्यामुळे पाच महिन्यांचे रॉकेल गेले कुठे असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला होता.या वृत्ताची दखल घेत अखेर तहसीलदारांनी नांदापूर येथे रॉकेल किती दिवसांपासून वाटप केले नाही. लाभ धारकांचे जवाब नोंदवून त्याची सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना बिटच्या मंडळ अधिकाºयांना दिल्या आहेत. तर वारंगा येथील अर्धघाऊक विक्रेत्यांनी किती दिवसांपासून नांदापूर येथील किरकोळ केरोसीन विक्रेत्यांना रॉकेल दिले नाही.याबाबत सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी वारंगा फाटा येथील मंडळ अधिकाºयाला दिल्या आहे. मागील आठ महिन्यापासून रॉकेल मिळाली नसल्याची तक्रार केली आहे. २३ आॅगस्ट रोजी नांदापूर येथील किरकोळ रॉकेल विक्रेता लाभर्थ्यांना रॉकेल वाटप करत असताना एकच गोंधळ उडाला व रॉकेल वाटप बंद करण्यात आले होते.दरम्यान, रॉकेलचा तालुक्यात काळाबाजार सर्रास सुरू असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली