शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

आदेशानंतरही चुकारे मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:40 IST

हिंगोली तालुका-खरेदी विक्री संघामार्फत सोयाबीन खरेदी करताना गैरव्यवहार झाल्याचे विशेष लेखा परिक्षकांच्या तपासणीत समोर आले आहे. यासाठी संघाच्या व्यवस्थापकास वैयक्तिक जबाबदार धरून संबंधिताने शेतकऱ्यांची रक्कम अदा करण्याचा आदेश दिला असला तरीही रक्कम मिळत नसल्याची शेतकºयांची ओरड आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : हिंगोली तालुका-खरेदी विक्री संघामार्फत सोयाबीन खरेदी करताना गैरव्यवहार झाल्याचे विशेष लेखा परिक्षकांच्या तपासणीत समोर आले आहे. यासाठी संघाच्या व्यवस्थापकास वैयक्तिक जबाबदार धरून संबंधिताने शेतकऱ्यांची रक्कम अदा करण्याचा आदेश दिला असला तरीही रक्कम मिळत नसल्याची शेतकºयांची ओरड आहे.सेनगाव तालुक्यातील रिधोरा येथील शंकर गंगाराम गाडे, हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथील शिवराम गणपती जगताप, पहेणीचे विठ्ठल पांडुरंग करंडे यांनी सहायक निबंधक कार्यालयाकडे तक्रार करून सोयाबीनचे चुकारे मिळत नसल्याचे म्हटले होते. या तक्रारकर्त्यांच्या किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या नावे नाफेडच्या केंद्रावर खरेदी-विक्री संघाकडे सोयाबीन विकले होते. त्यामुळे सहायक निबंधक सहकारी संस्था यांनी विशेष लेखा परीक्षक वर्ग-२, सहकारी संस्था पणन यांच्यामार्फत चौकशी करून अहवाल मागविला होता. तो सादर झाल्यानंतर संघाचे व्यवस्थापक प्रकाश नारायण पवार हे गैरव्यवहारास वैयक्तिक जबाबदार असून त्यांच्याकडून सदर रक्कमा वसूल करावी, असा स्पष्ट अहवाल देण्यात आला होता. त्यामुळे यातील तक्रारदारांची रक्कम दहा दिवसांच्या आत अदा करून त्याचा अनुपालन अहवाल देण्यास सहायक निबंधकांनी बजावले होते. अन्यथा गंभीर कारवाईचा इशाराही दिला होता. दरम्यान, २७ आॅगस्ट २0१८ रोजी गिरजाबाई झाडे यांनीही चुकारे मिळाले नसल्याची तक्रार केली होती. त्यांची रक्कम देण्यासही बजावलेले आहे.या आदेशानंतरही खरेदी-विक्री संघाने या शेतकºयांना कोणतीच रक्कम अदा केली नाही. त्यामुळे पुन्हा हे शेतकरी न्यायासाठी झगडत आहेत. खरेदी-विक्री संघातील गैरव्यवहाराची मागील अनेक दिवसांपासून बोंब सुरू असली तरीही यावर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.

टॅग्स :Hingoliहिंगोलीagricultureशेती