शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेच्या नुसत्या वायफळ चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:26 IST

: परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत नुसत्या वायफळ चर्चांनीच जि.प. व न.प. कार्यालयात मंडळी मनोरंजन करून घेत असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत नुसत्या वायफळ चर्चांनीच जि.प. व न.प. कार्यालयात मंडळी मनोरंजन करून घेत असल्याचे चित्र आहे. आचारसंहितेमुळे इतर कोणतीच कामे करता येत नसल्याने रिकाम्या बॅगा, उपाशी बैठकांच्या चर्चा रंगत आहेत.या निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश देशमुख, शिवसेनेचे विप्लव बाजोरिया व भाजप बंडखोर सुरेश नागरे हे मैदानात राहिले आहेत. दिग्गज उमेदवार पाहता घोडेबाजार चांगलाच वधारणार अशी शक्यता आधी होती. मात्र अजूनही त्या दिशेने कोणाचेच पाऊल पडत नसल्याने मतदारराजा चांगलाच भांबावला आहे. काहीजण तर परिस्थिती अशीच राहिली तर पडिकाला साथ देऊ, अशा वल्गना करू लागले आहेत. जि.प., न.प.च्या निवडणुका महागात पडलेल्यांना तर त्यावरून आमचा योग्य सन्मान व्हावा, असे वाटत आहे. परंतु हे होणे शक्य नसले तरीही सन्मानासाठी पक्षनिष्ठेलाही तिलांजली देण्याची अनेकांची तयारी दिसू लागली आहे. त्याचे परिणाम येत्या चार-पाच दिवसांत दिसू लागतील, असे वाटत आहे. काहींनी तर पडिकाला साथ द्यायची की कसे? हा शब्दप्रयोग परवलीचा बनविला आहे. तसे झाल्यास या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात रंगत वाढण्याची चिन्हे आहेत. मात्र तूर्त तरी आंबे, रिकाम्या बॅगा बऱ्या की, उपाशीपोटी बैठकांना हजेरी लावणे बरे यावरच पक्षीय मंडळी एकमेकांची उणी-दुणी काढून मनोरंजन करीत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे एकत्रित बळ जास्त असले तरीही घोडेबाजाराची लागण झाल्यास अवघड आहे. मात्र भाजपची जागा सेनेने हिरावल्याने त्यांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची राहणार आहे. यात अंतर्गत गणितांमध्ये दोन्हीकडूनही एकमेकांना सुरुंग लावण्याचे काम सुरू आहे. मात्र पडद्याआडच्या या हालचाली आहेत. त्यात कोण किती यशस्वी झाला, हे सांगणे अवघड आहे. प्रयत्न मात्र भक्कमपणे सुरू आहेत.एकमेकांच्या संपर्कातजिल्ह्यातील विविध भागातील मतदार उमेदवारांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. भेटी-गाठीत काही चांगभले झाले काय? याची विचारणा होत आहे. वसमत, हिंगोली, औंढा, सेनगाव, कळमनुरीतून एकमेकांना संदेश दिला जात आहे. मात्र सगळीकडेच ‘टंचाई’चा माहौल असल्याने आपापल्या परीने स्थानिक कारभारात मन गुंतवून ठेवले जात आहे.शॉक ट्रीटमेंटचा धोकाया निवडणुकीत सगळेच संथ गतीने पावले टाकत असले तरीही शेवटच्या टप्प्यात शॉक ट्रीटमेंटचा धोकाही नाकारता येत नाही. यापासून सावध राहावे लागणार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीElectionनिवडणूक