शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मग्रारोहयोच्या कामांवर केवळ ५00 मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:46 IST

काही भागात असलेली दुष्काळजन्य स्थिती, सोयाबीनचा संपलेला हंगाम. यामुळे शेतमजूर आता स्थलांतरित होताना दिसत आहेत. अनेकांनी तर पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांकडे कूच केल्याचे चित्रही दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : काही भागात असलेली दुष्काळजन्य स्थिती, सोयाबीनचा संपलेला हंगाम. यामुळे शेतमजूर आता स्थलांतरित होताना दिसत आहेत. अनेकांनी तर पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांकडे कूच केल्याचे चित्रही दिसून येत आहे.यंदा रबीच्या हंगामावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे विविध भागातील शेतमजुरांना सोयाबीननंतर कोणतेच शाश्वत रोजगाराचे साधन दिसत नाही. अनेकांनी यंदा मजुरीसाठी शहरी भागाकडे धाव घेतली आहे. काही भागातच सोयाबीन काढणीला मजूर लागत असले तरीही बहुतांश भागातील मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांनी मिळेल ते काम करण्यासाठी मोठ्या शहरांकडे कूच करणे सुरू केले आहे. बांधकाम, खोदकाम करण्यासाठी मोठ्या शहरात गेल्यास मग्रारोहयोपेक्षा जास्त मजुरी मिळते म्हणून ठरावीक मजूर तर या कामाकडे कायम पाठ फिरवितात. मात्र ज्यांना रबीच्या पिकांची थोडीबहुत आशा असते व ठरावीक रिकाम्या काळात कामाची गरज असते, अशा मजुरांना मग्रारोहयोच्या कामांशिवाय पर्याय नसतो. मात्र ही कामे सुरू करण्यासाठी ग्रामपंचायती उदासीन असल्याने अशा मजुरांचाही हिरमोड होत आहे. यंदा काही भागात तर सरसकट सर्वांनाच बाहेर कामाला जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यातच अनेकांना दिवाळीपर्यंत गावात थांबायची इच्छा असली तरीही हाताला काम नसल्यास सण कसा साजरा करायचा? या कारणाने त्यांनी स्थलांतराचा मार्ग पत्करला आहे. दिवाळीनंतर कुटुंबासह स्थलांतर करण्याचीही तयारी केली जात आहे. डोंगराळ भागात तर अतिशय विदारक चित्र आहे.जिल्ह्यात ग्रामपंचायतींसह विविध यंत्रणांनी सुरू केलेल्या कामांची संख्या अवघी ११४ आहे. यात २९ ग्रामपंचायतींनीच कामे सुरू केली आहेत. यामध्ये औंढ्यात ३ ग्रा.पं.च्या ७ कामांवर ३२, वसमतला २ ग्रा.पं.च्या १५ कामांवर ६0, हिंगोलीत १0 ग्रा.पं.च्या १४ कामांवर १0९, कळमनुरी तालुक्यात ६ ग्रा.पं.च्या ६८ कामांवर १९४, सेनगाव तालुक्यात ८ ग्रा.पं.च्या १0 कामांवर १७९ मजूर आहेत.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीGovernmentसरकार