शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

ग्रामीण भागातही आॅनलाईन खरेदीचे लोण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 01:07 IST

काही दिवसांपूर्वी शहरी भागापुरतेच मर्यादित असलेले आॅनलाईन खरेदीचे लोण आता ग्रामीण भागातील वाडी, तांड्यापर्यंत पोहचले आहे. येथील बसस्थानक परिसरात विविध कंपन्यांचे कुरियर प्रतिनिधी दररोज ग्राहकांचे पार्सल वितरित करताना दिसून येतात. यामधून महिन्याकाठी तालुक्यात तीन ते पाच लाखांच्या खरेदीचा व्यवहार होत असल्याचे कुरियर प्रतिनिधीने सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : काही दिवसांपूर्वी शहरी भागापुरतेच मर्यादित असलेले आॅनलाईन खरेदीचे लोण आता ग्रामीण भागातील वाडी, तांड्यापर्यंत पोहचले आहे. येथील बसस्थानक परिसरात विविध कंपन्यांचे कुरियर प्रतिनिधी दररोज ग्राहकांचे पार्सल वितरित करताना दिसून येतात. यामधून महिन्याकाठी तालुक्यात तीन ते पाच लाखांच्या खरेदीचा व्यवहार होत असल्याचे कुरियर प्रतिनिधीने सांगितले.दोन वर्षांत वाढलेल्या स्मार्टफोनच्या संख्येमुळे दुर्गम भागात इंटरनेट पोहोचले. मोबाईलच्या माध्यमातून थेट ग्रामीण भागातील पोस्टल कोडवर विविध वस्तूंचे वितरण व वस्तू परत घेण्याची सुविधा कंपन्यांकडून दिली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही आॅनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. पूर्वी काही ठराविक वस्तू आॅनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांना आता केंद्र शासनाच्या किरकोळ क्षेत्रातील गुंतवणुकीस सकारात्मक भूमिकेमुळे व कुरियर कंपन्यांच्या जाळ्याचा फायदा दिसतो. इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक व चैनीच्या वस्तूंबरोबरच किराणा, कटलरी, होजिअरी कपडे, पादत्राणे, किचनमध्ये लागणाºया वस्तू, औषधी, पुस्तके या विविध वस्तूंची किरकोळ विक्री ग्रामीण भागापर्यंत शक्य झाली आहे.छापील किंमतीच्या ५० टक्क्यांपर्यंत कमी किंमती व परत करण्याच्या सोप्या पद्धतीमुळे आॅनलाइन कंपन्या ग्राहकांना भुरळ घालत आहेत. अनेक उत्पादनांचे वेगवेगळे प्रकार घरात बसून बघता येतात. आॅनलाईन साईट म्हणजे मालाचे आभासी गोदामच. तिथे हवी ती वस्तू ग्राहकांना विकत घेता येते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत गरजेच्या प्रत्येक वस्तूंचे भांडार तळहातावरील स्मार्टफोनमध्ये विसावल्यामुळे आॅनलाईन खरेदी करणे सोपे झाले आहे. याचा सर्वात मोठा फटका येथील स्थानिक बाजाराला बसत आहे. एरवी ग्राहकांच्या गर्दीने फुलणाºया बाजारात सण-उत्सवाच्या काळातही शुकशुकाट दिसून येत आहे.

 

टॅग्स :HingoliहिंगोलीMarketबाजार