शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन संभ्रम ! कोरोनाचा दुसरा डोस न घेताच लसीकरणाचे प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 18:01 IST

कोविशिल्ड घेतलेल्या काही जणांना आता दुसरी लस घेतलेली नसतानाही तसा संदेश येत आहे. त्यामुळे अशांना आता दुसरी लस कशी मिळणार ? हा प्रश्नच आहे.

ठळक मुद्देसात ते आठ जणांना आतापर्यंत असा संदेश आला आहे.

हिंगोली : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ झाल्यानंतर सुरुवातीला लस मिळत नसल्याची ओरड होती. आता लस आहे तर ती कुणी घ्यायलाच तयार नाही. दुसरीकडे हिंगोलीत काही जणांना लसीचा दुसरा डोस न घेताच तो दिल्याचे लसीकरणाचे प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्त झाल्याने संभ्रम वाढत चालला आहे.

हिंगोली जिल्ह्यात लसीकरणात आतापर्यंत १ लाख ४८ हजार ७७८ डोस वापरले आहेत. यात १ लाख १४ हजार १७६ जणांना पहिला, तर यापैकी ३४ हजार ६०२ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. मात्र, दुसरा डोस घेण्यासाठी गत सहा महिन्यांत चार ते पाच वेळा निकष बदलले. सुरुवातीला २८ दिवसांनी, नंतर ४५ दिवसांनी, त्यानंतर ५६ दिवसांनी व दोन दिवसच ६२ दिवसांचा निकष होता. आता ८४ दिवसांचा निकष आला आहे. कोविशिल्ड ही लस घेणाऱ्यांसाठी असे बदललेले निकष दुसऱ्या डोसपासून वंचित ठेवणारे ठरले. मात्र, कोव्हॅक्सिनची लस घेतलेल्यांना आताही एक महिन्यानंतर दुसरा डोस दिला जातो. कोविशिल्ड घेतलेल्या काही जणांना आता दुसरी लस घेतलेली नसतानाही तसा संदेश येत आहे. त्यामुळे अशांना आता दुसरी लस कशी मिळणार ? हा प्रश्नच आहे.

सात ते आठ जणांना आतापर्यंत असा संदेश आला आहे. अशांची नेमकी संख्या किती, याचा शोध घेणे गरजेचे आहे. मात्र, अनेकांनी एकदा लस घेतली की पुन्हा नोंदणी करण्यासाठी काही दिवसांची मर्यादा पाळावी लागत आहे. त्यातच आता ८४ दिवस पूर्ण होताच अथवा ते पूर्ण होण्यापूर्वीच लसीचा दुसरा डोस घेतल्याचा संदेश येत असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. ऑनलाईन नोंदणी करूनच लस दिली जाते. त्यामुळे असा प्रकार होणे अवघड आहे. मात्र, असे घडले असेल तर ते गंभीर आहे. याबाबत चौकशी केली जाईल. संबंधितांना दुसरा डोस देण्याची व्यवस्थाही होईल.

काही गोंधळ तर नाहीया नावांचा वापर करून इतरांना तर लस दिली नाही ना, अशी शंका घ्यायची तर सध्या ३८ हजार लस उपलब्ध असताना कोणी लसीकरणालाच येत नाही. त्यामुळे नेमका हा तांत्रिक गोंधळ आहे की, यामागेही काही रॅकेट आहे, हे कळायला मार्ग नाही.- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकीत्सक

मी कोविशिल्ड लसीचा एक डोस घेतला आहे. मात्र, दुसरा डोस घेतला नसताना १३ जून रोजी दुपारी लस घेतल्याचा संदेश प्राप्त झाला. याबाबत आरोग्य विभागला कळविले आहे. आता हा डोस मिळणार की कसे? याची चिंता लागली आहे.-डॉ. श्रीधर कंदी, हिंगोली

मी कोविशिल्डचा दुसरा डाेस घेतलेला नाही. मात्र, काही जणांना तसे संदेश आल्याचे कळाल्यानंतर ऑनलाईन तपासले असता दुसरा डाेसही दिल्याचे प्रमाणपत्र मिळाले.- वर्षा धाडवे, हिंगोली 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसHingoliहिंगोली