शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीवरून येणारा दीड कोटीचा गुटखा हिंगोलीत पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 18:02 IST

ट्रकमध्ये जवळपास १ कोटी ६३ लाख रुपयाचा गुटखा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथे अवैधरीत्या गुटखा घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी आज दुपारी १२ वाजता पकडला. ट्रकमध्ये जवळपास १ कोटी ६३ लाख रुपयाचा गुटखा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली येथून लातूरकडे एका ट्रकमधून गुटखा नेण्यात येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी सापळा रचून वारंगाफाटा येथे एक ट्रक ( आरजे ११ - जीए- ९८४५ ) पकडला.  ट्रकची तपासणी केली असता त्यात  विविध कंपन्यांचा २३४ पोते गुटखा आढळला. या गुटख्याच्या बाजारातील किंमत जवळपास १ कोटी ६३ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा गुटखा आणि ट्रक असा एकूण १ कोटी ९३ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी चालक जितेंद्र रमेश गौड (रा. बसई डांग ता. बारी जि. धौलपूर राजस्थान) व  लोकेह पातीराम भारती ( रा. कोहुआ ) या दोघांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.  

ही कारवाई आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सपोउपनि ओमकांत चिंचोलकर, शेख बाबर, संदीप चव्हाण, राजकुमार जमधाडे, मुलगीर आदींनी केली.