शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदार नांदे यांच्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:21 IST

वसमतच्या तत्कालीन तहसीलदार सुरेखा नांदे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश वसमत न्यायालयाने दिले आहेत. त्यावरून वसमत पोलिसांत गुन्हाही दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : वसमतच्या तत्कालीन तहसीलदार सुरेखा नांदे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश वसमत न्यायालयाने दिले आहेत. त्यावरून वसमत पोलिसांत गुन्हाही दाखल झाला आहे.सन २०१६-१७ मध्ये दुष्काळी निवारण मदत निधी तहसील कार्यालयात प्राप्त झाला होता. २ लाख ८३ हजार रुपयांचा निधी संबंधित तलाठ्याच्या खात्यावर जमा करण्याऐवजी तहसीलदारांनी लिपिक खंदारे यांच्या नावावर जमा केला होता. या प्रकरणाची चौकशी झाली आणि तहसीलदार नांदे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. रक्कम वसुलीचीही कारवाई झाली. नांदे सध्या नायगाव येथे तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत.याप्रकरणी अर्धापूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ता शेख जाकेर यांनी अ‍ॅड. इद्रीस कादरी यांच्या माध्यमातून वसमत न्यायालयात प्रकरण दाखल केले होते व गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती. वसमत न्यायालयाने कलम १५६ (३) अन्वये तहसीलदार नांदे व लिपिक खंदारे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.याप्रकरणी तहसीलदार नांदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणात यापूर्वीच चौकशी होवून कारवाई झालेली आहे. वसुलीही करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता पुन्हा त्याच प्रकरणात कारवाई होणार असेल तर एकाच प्रकरणात ही दुहेरी शिक्षा ठरेल, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, दुष्काळ निवारण निधीच्या गैरव्यवहार प्रकरणात तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई झाली. मात्र ज्या लिपिकाच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली त्याच्यावर मात्र महसूल विभागाने कारवाई केलेली नाही, हे विशेष. या प्रकरणात सदर लिपिक मास्टर मार्इंड म्हणून चर्चेत आला होता.गुन्हा दाखल : पुन्हा प्रकरण चर्चेतदरम्यान, या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशान्वये फिर्यादी शेख जाकेर शेख सगीर रा. अर्धापूर यांच्या तक्रारीवरून तत्कालीन तहसीलदार सुरेखा नांदे, विद्यमान लिपिक भास्कर खंदारे यांच्या विरोधात फसवणुकीच्या कलमासह विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास पोनि उदयसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शेख आजम करीत आहेत.