हिंगोली : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्यावतीने जिल्हाभरात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हिंगोली येथे अग्रसेन चौकात भाजपने आंदोलन केले. यावेळी आघाडी सरकारने केलेल्या जाणीपूर्वक दुर्लक्षामुळे ओबीसींचे आरक्षण गेल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, प्रशांत सोनी, हमिद प्यारेवाले, पप्पू चव्हाण, दुर्गादास साकळे, शिवाजी मुटकुळे, यशोदा कोरडे, उमेश नागरे, उमेश गुट्टे, पाटील आदींची उपस्थिती होती.
औंढा नागनाथ तालुक्यात जिंतूर टी पॉईंटवर भाजपने आंदोलन केले.यातही कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच सेनगाव, कळमनुरी व वसमतलाही भाजपने ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन केले.