शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आता मोजणीचा नवा वाद सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:50 IST

वसमत नगर पालिकेच्या मालकीच्या व संपादीत केलेल्या मालमत्तांची विल्हेवाट लावण्याचे प्रकरण गाजत आहे. तक्रारी वाढल्याने मोजणीची टुम निघाली प्रत्यक्ष मोजणी सुरू झाली मात्र नगर पालिकेला मालमत्ता वाचवण्यासाठी मोजणी करायची कि निवळ वेळ काढूपणा करायचा असा नवा वाद आता समोर आला आहे. बुधवारी मोजणीच्या वेळी अनेक सदस्य व नागरिक हजर होते. मात्र तांत्रीक कारणाने मोजणी बंद पडली व आता पुन्हा नव्या तारखा देवून मोजणी होणार असल्याचे जाहीर झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : वसमत नगर पालिकेच्या मालकीच्या व संपादीत केलेल्या मालमत्तांची विल्हेवाट लावण्याचे प्रकरण गाजत आहे. तक्रारी वाढल्याने मोजणीची टुम निघाली प्रत्यक्ष मोजणी सुरू झाली मात्र नगर पालिकेला मालमत्ता वाचवण्यासाठी मोजणी करायची कि निवळ वेळ काढूपणा करायचा असा नवा वाद आता समोर आला आहे. बुधवारी मोजणीच्या वेळी अनेक सदस्य व नागरिक हजर होते. मात्र तांत्रीक कारणाने मोजणी बंद पडली व आता पुन्हा नव्या तारखा देवून मोजणी होणार असल्याचे जाहीर झाले.वसमत नगर पालिकेच्या मालकीच्या कोट्यवधी रुपयांच्या सर्व्हे नं. १८० मध्ये बोगस कागदपत्राद्वारे भुखंड खरेदी विक्री झाल्याचा व नगर पालिकेतून संचीकाच गायब झाल्याचा खळबळजनक प्रकार घडला. अनेक सदस्यांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रारीही केल्या; मात्र अद्याप काहीच झालेले नाही.सर्व्हे नं. १५० हा नगर पालिकेने संपादित केलेला ४ एकर २७ गुंठे जमिनीचा असाच घोळ सुरू आहे. नगर पालिकेच्या या जागेवर खाजगी व्यक्तींचा कब्जा झाला आहे. पेट्रोलपंपही झाला आहे. तर अनेकांनी पक्के बांधकाम करून घेतले आहेत. मुख्याधिकाºयांनी तर नगरपालिकेच्या जागांवर घर नंबर देऊन ही जमीनच खाजगी व्यक्तीच्या घशात घातल्याच्या प्रकार केला आहे. या दोन्ही जमिनीवरून प्रचंड वादळ सुरू आहे. तक्रारी वाढत चालल्याने प्रकरण थंड करण्यासाठी जमिनीची मोजणी करण्याची टूम काढली. मोजणी फी भरण्यात आली. दोन दिवसांपूर्वी सर्वे नं. १८० ची मोजणीसाठी भुमीअभिलेखचे कर्मचारी आले. सोबत न.प. अभियंता चव्हाणही होते. मात्र जे भुखंड गिळकृत केले त्या जागा ‘सेफ’ होतील, अशा पद्धतीने मोजणीचा प्रकार होत असल्याच्या तक्रारीवरून काही सदस्यांनी मोजणी बंद पाडली.बुधवारी सर्व्हे नं. १५० च्या मोजणीसाठी पथक आले मात्र नगर पालिकेने न.प.ची चार एकर २७ गुंठे जागा मोजणी ऐवजी भलत्याच मार्गाने मोजणी सुरू करण्यास भाग पाडल्याने वाद सुरू झाला.मुख्याधिकारी आले : हद्दच कळेनान.प.चे उपाध्यक्ष खैसर अहेमद, वैजनाथ गुंडाळे, अजगर पटेल, दिलीप भोसले, सीताराम म्यानेवार, दिवाकर पुंडगे, संजय भोसले आदींनी मोजणी व्यवस्थित करवून घेण्यासाठी मुख्याधिकाºयांना पाचारण केले. मात्र मुख्याधिकाºयांना न.प.ची जागा व हद्दच माहीत नसल्याचा प्रकार पाहावयास मिळाला.शेवटी सदस्य आक्रमक झाल्याने विश्रामगृहापासून मोजणी करण्यावर एकमत झाले. तोवर मोजणी मशीनची बॅटरी डिस्चार्ज झाली व मोजणीचा खोळंबा झाला आहे. आता पुन्हा मोजणीची तारीख मिळणार असल्याचे जाहीर झाले.दिवसभराच्या वाद, चर्चा व घोळानंतरही नगर पालिकेला जागा वाचवयाच्या कि नुसता वेळकाढूपणा करायचा हेच स्पष्ट झाले नाही. परिणामी उपस्थित सदस्यांनी तिव्र भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी जिल्हाधिकाºयांनी लक्ष घालून शासनाची मालमत्ता वाचवावी, अशी मागणी पुढे येत आहे.