शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मावेजा प्रकरणात दोन अधिकाऱ्यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:29 IST

पैनगंगा नदीवर वाशिम व हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर उकळी बॅरेजमध्ये गेलेल्या जमिनीचा मावेजा देण्यास विलंब करणाºया वाशिम लघुपाटबंधारे कार्यकारी अभियंता व भूमिअभिलेख उपाधीक्षक हिंगोली यांना जिल्हाधिकाºयांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. तर शासनाकडे कारवाईची शिफारस करण्याचा इशारा दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पैनगंगा नदीवर वाशिम व हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर उकळी बॅरेजमध्ये गेलेल्या जमिनीचा मावेजा देण्यास विलंब करणाºया वाशिम लघुपाटबंधारे कार्यकारी अभियंता व भूमिअभिलेख उपाधीक्षक हिंगोली यांना जिल्हाधिकाºयांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. तर शासनाकडे कारवाईची शिफारस करण्याचा इशारा दिला आहे.दोन दिवसांपूर्वी उकळी बॅरेजमध्ये जमिनी गेलेल्या शेतकºयांना मावेजा मिळाला नसल्याने जलसमाधी आंदोलनाचा प्रयत्न झाला. त्यानंतर बॅरेजेसच्या प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकाºयांनी पूर्ण केली आहे.पैनगंगा नदीवर वाशिम लघुपाटबंधारे विभागाकडून मागील सहा ते सात वर्षांत ११ बॅरेज उभारण्यात आले. वाशिम व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांना याचा फायदा आहे. तसेच दोन्ही जिल्ह्यांतील शेतकºयांच्या जमिनी प्रकल्पाखाली गेल्या. यात काही जमीन परस्पर लघुपाटबंधारेने खरेदी केली. तर इतर जमिनीचे रीतसर भूसंपादन केले. यात अनेक ठिकाणच्या तक्रारी होत्या. जमीन बुडित क्षेत्रात जात नसताना भूसंपादित करून मावेजा दिल्याच्या तक्रारींनंतरही कारवाई मात्र काहीच झाली नाही. यात जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनीही अवाजवी भूसंपादनाची शंका व्यक्त करून विभागीय आयुक्तांना पत्र देत आपल्या स्तरावरून चौकशी समिती नेमण्याची शिफारस केली होती. मात्र तेव्हा काहीच झाले नाही.दरम्यान, मागील महिनाभरापासून उकळी येथील ११ शेतकरी मावेजासाठी आक्रमक झाले होते. मावेजा न मिळाल्यास जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. मुळात यात वाशिम लघुपाटबंधारे विभागाने मागील दोन वर्षांपासून दिरंगाई चालविली होती. ४ आॅक्टोबर २0१६ रोजी भूसंपादन अहवाल प्राप्त झाला होता. नंतर १६ फेब्रुवारीपर्यंत लीगल सर्च रिपोर्टचा पत्ता नव्हता. तर ९६ आर. जमिनीचे अवाजवी भूसंपादन होत असल्याचा मुद्दाही अनिर्णित होता. त्यामुळे भूमिअभिलेख व वाशिम लघुपाटबंधारेने यात लक्ष घालण्याच्या वारंवार सूचना दिल्या तरीही कोणतीच कारवाई होत नव्हती. शेवटी जिल्हा प्रशासनाने यात ९६ आर. जमीन कमी करून शासनाचे नुकसान टाळले. यात जवळपास १५ शेतकºयांची २ हेक्टर १९ आर जमीन संपादित झाली आहे. तर ४५ लाखांचा मावेजा लागणार आहे. या दोन्ही विभागांच्या दुर्लक्षामुळे शेतकºयांना मात्र मावेजा मिळत नव्हता. त्यामुळे १९ जून २0१८ रोजी शेतकºयांनी जलसमाधीचा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी वाशिम लघुपाटबंधारेची इतर भूसंपादनाची रक्कम वळती करून या शेतकºयांना मावेजा देण्याचा आदेश दिला. मात्र मागील दोन वर्षांच्या रक्कमेवर व्याजाची मागणी व जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी आदींवर कारवाईची मागणी करीत जलसमाधी आंदोलनस्थळी तसा प्रयत्नही केला. अजूनही हे प्रकरण पूर्णपणे शांत झाले नसले तरीही वस्तूनिष्ठ अहवाल तयार करून यातील दोषींवर कारवाईची शिफारस जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीGovernmentसरकार