शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पाच गावांत नाही ब्लिचिंगचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:47 IST

तालुक्यातील १०१ ग्रामपंचायती अंतर्गत पाच ग्राम पंचायतीमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापरच ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे पंचायत समितीचे गटविकास डॉ. अविनाश गायकवाड यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : तालुक्यातील १०१ ग्रामपंचायती अंतर्गत पाच ग्राम पंचायतीमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापरच ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे पंचायत समितीचे गटविकास डॉ. अविनाश गायकवाड यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.औंढा नागनाथ तालुक्यात बोअरवेल, नळयोजना, हातपंप, विहिरी अशा स्त्रोतातून पिण्याच्या पाण्यासह वापरातील पाण्याची व्यवस्था आहे. आगामी काळात तालुक्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. कित्येक गावात कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना कागदावरच आहेत. त्या योजनांचा निधी मात्र फस्त करण्यात आला आहे. तालुक्यात बहुतांश ग्रामपंचायतींकडून ब्लिचिंग पावडरचा वापर करून पाणी स्त्रोतांचा वापर करीत आहेत. परंतु सेंदूरसना, गवळेवाडी, सारंगवाडी, गांगलवाडी, बर्र्गेवाडी या पाच ग्रामपंचायतीकडून ब्लिचिंग पावडरचा वापरच करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे त्या गावात निश्चितच दूषीत पाणी पुरवठा होत असणार, यात शंका बाळगण्याचे कारणच नाही. या गंभीर बाबीकडे ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत आहे, हे एक न उलगडणारे कोडेच आहे. आता सर्वांत तीव्र पाणीटंचाई सर्वत्र निर्माण होणार असल्याने पिण्याचे पाणी मिळण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागणार त्यामुळे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. पाच गावात मात्र पिण्याच पाण्यात ब्लिचिंग पावडरचा वापरच होत नसल्याची बाब समोर आल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले.