शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेश न दिल्यास कारवाई करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:17 IST

आरटीई प्रवेश न देणा-या शाळांवर कारवाईचा इशारा शासनाने दिल्यानंतर इंडीपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशनने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यात अंतरिम आदेश देताना २0१८-१९ मध्ये अर्जदार शाळांनी आरटीई २५ टक्के कोट्यांतर्गत प्रवेश देण्यास नकार दिल्यास त्यांच्याविरुद्ध शासनाने कोणतेही जबरदस्तीचे कृत्य करू नये, असे म्हटल्याचे इसाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद खंडपीठाचा अंतरिम आदेश इसाची याचिका, परतावाच मिळत नसल्याची बोंब

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आरटीई प्रवेश न देणा-या शाळांवर कारवाईचा इशारा शासनाने दिल्यानंतर इंडीपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशनने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यात अंतरिम आदेश देताना २0१८-१९ मध्ये अर्जदार शाळांनी आरटीई २५ टक्के कोट्यांतर्गत प्रवेश देण्यास नकार दिल्यास त्यांच्याविरुद्ध शासनाने कोणतेही जबरदस्तीचे कृत्य करू नये, असे म्हटल्याचे इसाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.इसाने दिलेल्या माहितीनुसार या संघटनेने १६ जानेवारी २0१८ रोजी औरंगाबाद खंडपीठात रीट याचिका दाखल केली होती. यात त्यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मागील ५ ते ६ वर्षांमध्ये देण्यात आलेल्या २५ टक्के आरटीई प्रवेशापोटीच्या प्रलंबित फी परताव्याबाबत मागणी केली होती. यापूर्वी शासनदरबारी ही मागणी अनेकदा लावून धरली होती. विविध आंदोलनेही केली. ३१ डिसेंबर २0१७ पर्यंत यासाठी अंतिम मुदत दिली होती. अन्यथा २0१८-१९ या वर्षातील २५ टक्के आरटीई प्रवेशावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिला होता, असे पत्रकात म्हटले आहे. यामुळे अनेक संस्थाचालकांनी शाळांची आॅनलाईन नोंदणीच केली नव्हती. मात्र शिक्षण विभागाने आॅटो नोंदणी करून घेतल्याचेही पत्रकात म्हटले आहे.या सर्व बाबींच्या अनुषंगाने टाकलेल्या याचिकेवर अंतरिम निर्णय देताना खंडपीठाने शासन व प्रशासनास २३ फेब्रुवारीपर्यंत लेखी जबाब सादर करण्यास सांगितले आहे. तर त्यांनी वेळेत लेखी जबाब सादर न केल्यास एक हजार रुपये न्यायालयीन खर्च म्हणून जमा करावे लागतील, तसेच या रक्कमेची प्रतीपूर्ती सरकारी खजान्यातून करता येणार नाही. तर शैक्षणिक वर्ष २0१८-१९ मध्ये अर्जदार शाळांनी आरटीई २५ टक्के कोट्याअंतर्गत प्रवेश देण्यास नकार दिल्यास या कारणासाठी त्यांच्याविरुद्ध कोणतेही जबरदस्तीचे कृत्य करू नये, असेही आदेशात म्हटले आहे. न्यायमूर्ती एस.एम. गव्हाणे व न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांच्यासमक्ष या प्रकरणाची सुनावणी झाली.