हिंगोली जिल्ह्यात हिंगोली शहर १७०, कळमनुरी ५७९, सेनगाव ९३, वसमत ४४, औंढा ४१ अशा एकूण ९२७ रॅपिड अँटिजन चाचण्या केल्या. यात एकही बाधित आढळला नाही, तर हिंगोली परिसरात आरटीपीसीआरच्या १० चाचण्या करण्यात आल्या. यात १ बाधित आढळला. कळमनुरीत ३३२, तर औंढ्यात १९ चाचण्या करूनही कोणी बाधित आढळला नाही. हिंगोलीतील नवीन कोविड हॉस्पिटल येथून एक जण बरा झाल्याने घरी सोडले. जिल्ह्यात आजपर्यंत १५ हजार ९५१ रुग्ण आढळले. यापैकी १५ हजार ५४५ बरे झाले. सध्या २२ जणांवर उपचार सुरू आहेत. ३८४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. सध्या विविध ठिकाणी १२ जणांची प्रकृती गंभीर असल्याने ऑक्सिजनवर ठेवण्यात आले, तर २ अतिगंभीर बायपॅपवर आहेत.
कोरोनाचा नवा एक रुग्ण; एक बरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST