शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नवलगव्हाणचा तलाव प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : तालुक्यातील नवलगव्हाण येथील दोन वर्षापासून रेंगाळत पडलेल्या जलसंपदा विभागाच्या तलावाचा प्रश्न आता मार्गी लागला ...

ठळक मुद्देहिंगोली : जलसंपदा विभागाने दिल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील नवलगव्हाण येथील दोन वर्षापासून रेंगाळत पडलेल्या जलसंपदा विभागाच्या तलावाचा प्रश्न आता मार्गी लागला असून तलावाचे काम पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशानाने मागीतलेली रक्कम देण्याची जलसंपदा विभागाने तयारी दाखविलेली आहे. त्यामुळे येत्या जून महिन्यात तलावात पाणी साचणार असल्याचे चित्र आहे.नवलगव्हाण येथील तलावाचे काम ८५ टक्के पुर्ण झाले होते. परंतु उर्वरित काम हे रेल्वे हद्दीत येत असल्याने त्याला रेल्वेची परवानगी घेणे गरजेचे असल्याने हे काम चांगलेच लांबणीवर गेले होते. वास्तविक पाहता जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी तलावाला भेट देवून बारकाईने पाहणी केल्यामुळे तलावाचे काम करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. यासाठी रेल्वे प्रशासनाकडे जलसंपदा विभागाने पत्रव्यवहार सुरूच ठेवला होता. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने ४ कोटींची मागणी जलसंपदा विभागाकडे केली आहे. ती देण्याचीही तयारी जलसंपदा विभागाने दाखविली असून पहिल्या टप्प्यात अडीच कोटी रुपयांचा धनादेश रेल्वे प्रशासनाला गुरूवारी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर जूनअखेरपर्यंत काम संपविण्याचेही पत्र दिले जाणार आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने हालचाली सुरू केल्यास हा प्रश्न येत्या जूनपर्यंत निकाली निघण्याची शक्यता आहे.तलाव बांधकामाची रक्कम साडेपाच कोटी असली तरीही इतर खर्च मिळून २४ कोटीपर्यंत जात आहे.