शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शाळा बंद असतानाही ‘निसर्गशाळा’ सुरूच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:29 IST

हिंगोली : शाळा म्हटले की, मुले अन् त्यांचा किलबिलाट आलाच. परंतु, कवी मनाच्या अण्णा जगताप यांनी काेराेना काळात मुलांना ...

हिंगोली : शाळा म्हटले की, मुले अन् त्यांचा किलबिलाट आलाच. परंतु, कवी मनाच्या अण्णा जगताप यांनी काेराेना काळात मुलांना निर्सगाचे महत्त्व सांगण्यासाठी ‘ऑनलाईन निसर्गशाळा’ सुरू करून एक आगळा वेगळा नैसर्गिक उपक्रम विद्यार्थ्यांसमाेर ठेवला आहे.

‘एक मूल तीस झाडे’ या अभियानामार्फत ‘निसर्गशाळा’ उपक्रमात महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांतील १८५ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये नाशिक, पालघर, मुंबई, पुणे, औरंगाबाद, सांगली, रत्नागिरी, अहमदनगर, यवतमाळ, बीड, लातूर, नांदेड, वाशिम, नागपूर अन् हिंगोली या जिल्ह्यांतील मुलांचा समावेश आहे. सर्व शाळा आजमितीस बंद असतानाही ‘ऑनलाईन निसर्गशाळा’ मात्र अविरतपणे सुरू आहे.

घरच्या घरी रोपवाटिका तयार करणाऱ्या जवळपास ५० विद्यार्थ्यांनी रोपवाटिका तयार करायला सुरुवात केली. या रोपवाटिकांना सहभागी मुलांचीच नावे दिली जातात, तसेच उल्लेखनीय काम कारणाऱ्या विद्यार्थ्यास ‘उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार’ दिला जातो. यामुळे ‘निसर्गशाळा’ मुलांना आवडू लागली आहे. सर्वच जिल्ह्यांतील मुले या उपक्रमात सहभागी होऊ लागली आहेत.

निसर्गशाळा आठवड्यातून एक दिवस ऑनलाईन भरवली जात असून, बाकीच्या दिवशी निसर्गामध्ये उतरून मुलांनी कृती करायची असते. या अभियानासाठी प्रा. ज्ञानोबा ढगे, रवी देशमुख, बाळू बुधवंत, बालासाहेब राऊत, विलास जाधव, राजा कदम, संजय मुसळे, प्रेमानंद शिंदे, अरुण वडजे, रतन आडे, श्याम राऊत हे सहकार्य करीत आहेत.

१४ वर्षांखालील मुलांच्या अंगी निसर्गाविषयी जाणिवा - नेणिवा तयार होऊन माती, पाणी, शेती, झाड, शेतकऱ्यांच्या विषयी प्रेम निर्माण व्हावे, हा मुख्य उद्देश ! मुलांचे नाते निसर्गाशी बालवयात घट्ट हाेते आणि पर्यावरणाचे संतुलन निर्माण होऊन मुले निरोगी जीवन जगू शकतात.

- अण्णा जगताप, निसर्गाची शाळा एक मूल, तीस झाडे अभियान

फोटो नंबर २४