शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

अरुंद रस्ते, अरुंद गल्लीमुळे वाहने चालविणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:28 IST

२०११च्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाख ७८ हजार ९७३ एवढी होती. त्यानंतर, त्यामध्ये जवळपास १ लाख ७९ ...

२०११च्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाख ७८ हजार ९७३ एवढी होती. त्यानंतर, त्यामध्ये जवळपास १ लाख ७९ हजार एवढी वाढ झाली असल्याचे सांगण्यात येते. म्हणजे आजमितीस जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ५७ हजार ९७३ एवढी झाली आहे, तर शहराची लोकसंख्या १ लाख ८५ हजार एवढी आहे. हिंगोली जिल्ह्याची निर्मिती १ मे, १९९९ रोजी झाली. यापूर्वी हिंगोली जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये एक मोठा तालुका म्हणून कार्यरत होता. जिल्हा होऊन आजमितीस २२ वर्षे झाले आहेत, परंतु काही कायापालट झालेला दिसत नाही. नांदेड नाका ते गांधी चौक हा रस्ता जर सोडला, तर असा कोणताच मोठा रस्ता हिंगोली शहरात सध्यातरी अस्तित्वात नाही.

तहसील कार्यालय हे अकोला रोडवर असून, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद शहराच्या बाजूस नव्याने थाटली गेली आहेत. नगरपालिका, बस स्थानक, अग्निशमन दल, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, ग्रामीण पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाणे, पोलीस शहर वाहतूक कार्यालये शहरातून जाणाऱ्या अकोला रोडच्या बाजूलाच आहेत.

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना, कापड गल्ली, मच्छी मार्केट, भाजी मंडई, फुल मार्केट, जलेश्वर परिसर, सोनार गल्ली आदी ठिकाणी गाडी ठेवण्यावरून वादही निर्माण होतात. शहरात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना गाडी कुठे ठेवावी, असा मोठा प्रश्न पडतो. बहुतांश वेळा गांधी चौक येथे वाहन उभे करून खरेदीसाठी दुकानावर यावे लागते. चारचाकी तर सोडा साधी दुचाकीही उभी करता येत नाही. सणावरांच्या दिवशी तर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. शहर वाहतूक पोलीस आल्यानंतर वाहतूककोंडी सुरळीत होते. शहरातील गजबजलेल्या भागात सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत वर्दळ असते.

कापड गल्ली कसरतीचे ठिकाण

शहरातील कापड गल्ली हा भाग हिंगोली जिल्हा निर्मिती पूर्वीचा आहे. या ठिकाणी शहरासह ग्रामीण भागातील नागरिक कपडा खरेदीसाठी येतात. याच गल्लीच्या बाजूला सराफांची दुकाने आहेत. या ठिकाणी चारचाकी वाहन आले की, वाहतुकीची कोंडी होते. अशा वेळेस दुकानदार, तसेच ग्राहकांनाही त्रास सोसावा लागतो.

...तर वाहन मालकांवर कारवाई

वाहन रस्त्यात लावणे व वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी १२२ कलमान्वये संबंधित वाहन चालकास २०० रुपये लावला जावू शकतो, परंतु कोणालाही ना दंडाची भीती, ना कारवाईची. बिनधास्तपणे कोणीही कुठेही वाहने उभी करीत आहेत. खरे पाहिले, तर नगरपालिकेने जागोजागी पार्किंगची व्यवस्था करायला पाहिजे, परंतु नगरपालिकेने अजून तरी पार्किंगची व्यवस्था केली नाही. सण, उत्सव आल्यास थोड्या प्रमाणात बांबू लावले जातात. नंतर मात्र ‘जैसे थे’ होऊन बसते. वेळीच नगरपालिकेने लक्ष देऊन पार्किंगचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.

शहराची लोकसंख्या - १ लाख ८५ हजार

दुचाकीची संख्या (जिल्ह्याची) १,५३,०९६

चारचाकींची संख्या (जिल्ह्याची) १४,६८२

-