शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

खासदार राजीव सातव यांना सलग चौथ्यांदा संसदरत्न पुरस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 19:09 IST

१९ जानेवारी रोजी तामिळनाडू येथील राजभवनात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.

हिंगोली : हिंगोलीचे खा. राजीव सातव यांना संसदेतील अष्टपैलू कामगिरीबद्दल सलग चौथ्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. १९ जानेवारी रोजी तामिळनाडू येथील राजभवनात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.

चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाऊंडेशनच्या वतीने २००९ पासून दरवर्षी लोकसभेतील विविध कामगिरीसाठी चार जणांना हा पुरस्कार देण्यात येतो. खासदाराची संसदेतील कामगिरी त्यांचा विविध चर्चांमधील सहभाग, उपस्थित केलेल्या प्रश्नांची संख्या, खासगी सदस्य विधेयक संख्या, सभागृहातील उपस्थिती यासंदर्भात पीआरएस इंडियाने दिलेल्या आकडेवारीवरुन कामगिरीची आढावा घेऊन लोकसभा सचिवालयामार्फत पुरवलेल्या माहितीवरुन याचे मूल्यांकन निवड समितीमार्फत केली जाते. 

लोकसभेच्या हिवाळी अधिवेशन २०१९ पर्यंत खा.सातवांनी ८१ टक्के उपस्थिती लावत ११७ वेळा चर्चेची सुरुवात, ८८ वेळा प्रत्यक्ष चर्चेत सहभाग नोंदवला. तारांकीत व अतांराकीत असे १०७५  प्रश्न उपस्थित करुन २३ खाजगी सदस्य विधेयकही मांडले. या अष्टपैलू कामगिरीवरुन खा.राजीव सातव यांची संसदरत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे.  या पुरस्कार निवड समितीत केंद्रीय गृहराज्यमंत्री खा.हंसराज अहीर, केंद्रीय राज्यमंत्री खा.अर्जुन मेघावाल, शिवसेनेचे खा.आनंदराव अडसूळ यांचा समावेश आहे. 

तामिळनाडू येथील राजभवनात येत्या १९ जानेवारी रोजी ही पारितोषिके वितरित करण्यात येणार आहेत. या पारितोषक वितरण सोहळ्यास तामिळनाडुचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल, केंद्रीय राज्यमंत्री पी.पी चौधरी, आयआयटी मद्रासचे संचालक डॉ.भास्कर राममूर्ती, प्राईम पाइंटचे अध्यक्ष के.श्रीनिवास आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

देशात खा.सातव दुसऱ्या क्रमांकावरलोकसभेतील ५४३ खासदारांच्या कामकाजाचे मूल्यांकनात हिंगोलीचे खा.राजीव सातव देशात आपल्या अष्टपैलू कामगिरीवरून दुसऱ्या क्रमांकावर असुन, सातव यांना १२१५ अंक मिळाले आहे. पहिल्या क्रमांकावर १२७२ अंक मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा.सुप्रियाताई सुळे तर तिसऱ्या क्रमांकावर १२११ अंक मिळवून शिवसेनेचे खा.श्रीरंगअप्पा बारणे आहेत.

टॅग्स :Member of parliamentखासदारRajeev Satavराजीव सातवHingoliहिंगोली