शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम आरक्षणासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:37 IST

जमीयत उलमा ए हिंदतर्फे शासकीय, निमशासकीय सेवेत तसेच शिक्षणामध्ये मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी हिंगोली शहरातील गांधीचौक येथे २३ नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जमीयत उलमा ए हिंदतर्फे शासकीय, निमशासकीय सेवेत तसेच शिक्षणामध्ये मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी हिंगोली शहरातील गांधीचौक येथे २३ नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपाल यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या २०१४ च्या शासननिर्णयान्वये राज्यातील शासकीय व निमशासकीय सेवामध्ये आणि शैक्षणिक संस्थेत मुस्लिम समाजाचे एकूण ५० प्रवर्गाला विशेष मागास प्रवर्ग-अ ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्याआधी राज्य शासनाने अध्यादेश क्रमांक १४ २०१४ अन्वये अध्यादेश निर्गमित करून अधिनियम मध्ये विशेष तरतूद केली होती. परंतु हा अध्यादेश सहा महिन्याच्या आत विधिमंडळाने पारीत न केल्याने ते अध्यादेश व शासन निर्णय अधिक्रमित झालेला आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सदर अध्यादेशावर निर्णय देताना मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देणे योग्य असून तशी गरज असल्याचा न्यायनिवाडा दिला. परंतु आतापर्यंत राज्य शासनाने मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेले नाही. म्हणून मुस्लिम समाज बांधवांतर्फे शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. निवेदनावर रियाज मो. बशीर, तौफीक अहमद मजीत खॉन, शे. नोमान नवेद शे. नईम, सनाउल्लाखाँ वसीम, शे. बासीत शे. महेबुब, साजीतखॉ, मो. तौफीक हाजी अ. रज्जाक, शेख जमील शेख इब्राहिम यांच्यासह जमीयत उलमा ए हिंद संघटनेच्या पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत. आंदोलनात जिल्हाभरातील मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा