शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत डॉक्टरांनी केले आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:48 IST

विविध मागण्यांसंदर्भात डॉक्टर असोसिएशनच्या वतीने २८ जुलै रोजी हिंगोली शहरात आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विविध मागण्यांसंदर्भात डॉक्टर असोसिएशनच्या वतीने २८ जुलै रोजी हिंगोली शहरात आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.केंद्र सरकारने मांडलेले आणि लोकसभेने संसदीय स्थायी समितीकडे पुनर्विलोकनार्थ पाठविलेले राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकास इंडियन मेडिकल असोसिएशन या आधुनिक वैद्यक शास्त्र डॉक्टरांच्या संघटनेने ठाम विरोध केला आहे. सध्याचा भारतीय वैद्यक परिषद कायदा आणि प्रस्तावित विधेयक दोहोंची उद्दिष्टे सारखीच आहेत. मग नवीन कायद्याची गरजच काय? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. आंदोलनामध्ये खाजगी डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदर राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक हे, लोकशाहीविरोधी, स्वत:च्याच उद्दिष्टांशी फारकत असणारे, अनेक उपचार पद्धतींची अशास्त्रीय सरमिसळ करणारे व आयुर्वेद, युनानी, होमिओ या उपचार पद्धतींच्या विकासाला मारक, सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने धोकदायक आहे. तर धनदांडग्यांचे हीत जपणारे असल्यामुळे ते संसदेने पूर्णपणे फेटाळायला हवे, अशी मागणी आहे.आंदोलनात डॉ. जयदीप देशमुख, डॉ. किशन लखमावार, डॉ. स्नेहल नगरे, डॉ. बगडीया, डॉ. भगत, डॉ. चौधरी, डॉ. काबरा, डॉ. तोष्णीवाल, डॉ. घट्टे, डॉ. पवार, डॉ. अमित शहा, डॉ. सत्यनारायण तापडीया यांच्यासह मोठ्या संख्येने शहरातील डॉक्टर सहभागी झाले होेते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीdocterडॉक्टर