शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

विद्युत जोडणी प्रकरणात कारवाईच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:40 IST

विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यानी अवैध विद्युत जोडणी पकडल्यानंतरही दोन दिवस हे प्रकरण थंडावले होते. मात्र ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच विद्युत वितरण कंपनीमध्ये खळबळ उडाली असून, आता एका प्रकरणात कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कावरवाई तर दुसºया प्रकरणात दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यानी अवैध विद्युत जोडणी पकडल्यानंतरही दोन दिवस हे प्रकरण थंडावले होते. मात्र ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच विद्युत वितरण कंपनीमध्ये खळबळ उडाली असून, आता एका प्रकरणात कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कावरवाई तर दुसºया प्रकरणात दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.एकीकडे गोरगरिबाने विद्युत मीटरचे बिल भरण्यास जराही विलंब केला तर त्याची विद्युत जोडणी खंडित केली जाते. त्यातच एखाद्याचा आकडा पकडल्यावर तर काही खैरच नाही. मात्र एखाद्या व्यावसायिक ठिकाणी अवैध जोडणी पकडली आणि तीही स्वत: अधीक्षक अभियंत्यानी पकडल्यास यात वेळीच कारवाई होण्याची अपेक्षा होती. मात्र अजून तरी तसे काहीच झाले नाही. या प्रकरणी अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले चौकशी सुरु आहे. मात्र चूक तर आमच्याच कर्मचाºयाची आहे. त्यामुळे प्रथम त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. नंतर पुढील प्रक्रिया करण्यात येईल. तर कपड्याच्या दुकानातील मीटर बदलीचेही प्रकरण चांगलेच गंभीर आहे. त्या दुकानादाराने नेमके मीटर कोणत्या कारणामुळे बदलले त्याचेही अद्याप कारण समजलेले नाही.त्यामुळे नियमानुसार संबंधित ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार आहे. शहरातील या दोन्ही घटनेने मात्र एकच खळबळ उडाली आहे. तर दोन्ही प्रकरणात होणाºया कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारवाई करण्यासाठी महावितरण कंपनीने आता कंबर कसली असली तरीही त्यात येणाºया अडचणींवर ते कशी मात करणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे. कारवाई न झाल्यास इतरांचे मनोबल मात्र वाढणार आहे.कारवाईचे निवेदन४यात प्रकरणात व्यावसायीक दुकानात अवैध विद्युत जोडणी ही आर्थिक व्यवहारातून झाल्याने संबंधित अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना बहुजन संघर्ष मित्र मंडळच्या वतीने दिले. निवेदनावर योगेश नरवाडे, विक्की काशिदे, विक्की खंदारे, निखिल कवाने, बंटी कुटे, मयूर नरवाडे, विशाल दुधमल, विनोद ठोके, शुभम पाईकराव आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण