शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

लोकसभेपेक्षा विधानसभा इच्छुकांचीच जास्त धावपळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:59 IST

लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. मात्र जणू विधानसभेचीच निवडणूक त्याअगोदर होणार की काय? अशा पद्धतीने सर्वच पक्षांतील इच्छुकांची निवडणूकपेरणी सुरू झाली आहे. पुढाऱ्यांच्या या विचित्र तºहेत मतदारही बुचकळ्यात पडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. मात्र जणू विधानसभेचीच निवडणूक त्याअगोदर होणार की काय? अशा पद्धतीने सर्वच पक्षांतील इच्छुकांची निवडणूकपेरणी सुरू झाली आहे. पुढाऱ्यांच्या या विचित्र तºहेत मतदारही बुचकळ्यात पडले आहेत.पुढील सहा महिन्यांत लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार हे निश्चित आहे. त्यामुळे लोकसभेसाठी इच्छुक असलेल्यांनी गाजावाजा करणे, दौरे करणे काही नवीन नाही. पण त्यामध्ये फारसी कोणी आघाडी घेतेय, असे चित्र नाही. काँग्रेसचे विद्यमान खा.राजीव सातव यांना मात देणे तेवढे सोपे नाही, हे हेरून अनेकांनी तर बिळात लपून बसणेच पसंत केल्याचे दिसत आहे. त्यातच युती झाली तर जागा सेनेला सुटेल, असे चित्र आहे. त्यामुळे शिवसेनेकडून आ.जयप्रकाश मुंदडा यांच्याशिवाय दुसरा कोणी समोरही यायला तयार नाही. त्यामुळे डॉ.मुंदडा हेच सेनेचे उमेदवार राहतील, अशी बांधली जाणारी अटकळ सत्यात उतरल्यास नवल नाही.त्यांनी काही भागात तशी चाचपणी करण्यासाठी दौरेही केले. सेनेच्या काहींना हौस तर भारी मात्र ‘अर्थ’कारण जमणार नसल्याने उगीच दुसºयांच्याच कार्यक्रमांना हजेरी लावत ‘तुम्हारे खत मे हमारा सलाम’ अशी भूमिका निभावणे सुरू केले आहे. भाजपकडूनही खंडीभर नेते असताना माजी खा.शिवाजी माने यांनीच काय तो मतदारसंघातील विविध भागात दौरा केला. नुसती इच्छाशक्तीच नव्हे, तर लढण्याची तयारी असलेल्यांपैकी तेवढेच एक नाव दिसत आहे. बाकी युती नाही झाली तर ऐनवेळी पक्षाकडे उमेदवारी मागायलाच हजेरी लावतील, असे दिसत आहे.दिवाळीच्या सणापासून लोकसभेचे इच्छुक खºया अर्थाने मैदानात येतील, असे वाटत होते. मात्र त्याचा काहीच मागमूस दिसत नसल्याने ‘इतना सन्नाटा क्यूं है भाई’ असे म्हणण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे.एकीकडे लोकसभेच्या इच्छुकांचे हे हाल असताना दुसरीकडे विधानसभा इच्छुक मात्र मुंडावळ्याच बांधून बसलेत. विविध कार्यक्रमांचा धडाका सुरू आहे. कळमनुरीत विद्यमान आ.संतोष टारफे यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेचे संतोष बांगर यांचे दौरे जोरात आहेत. याशिवाय भाजपचे माजी आ.गजानन घुगे हेही फिरताना दिसत आहेत. हिंगोलीत भाजपचे आ.तान्हाजी मुटकुळे यांना टक्कर देण्यासाठी आधी काँग्रेसकडून विनायक देशमुख, श्यामराव जगताप ही मंडळी तयारी करीत होती. आता सुरेश सराफांची भर पडली. दुसरीकडे पक्षाची भूमिका काय राहिल हे माहिती नाही, मात्र माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकरही जोरात सक्रिय झाले आहेत. शिवसेनेकडून रुपाली पाटील गोरेगावकर याही दौरे करून वातावरणनिर्मितीचा प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आ.रामराव वडकुते यांनी तर जाहीरपणे विधानसभेला उभे राहणार असल्याचे सांगून कामाला लागल्याचेच दाखवून दिले. मागच्या वेळी माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी येथे राकाँकडून निवडणूक लढविली होती. शिवाय भाजपचा आमदार असताना याच पक्षाचे रामरतन शिंदे हेही विविध मुद्दे घेवून विधानसभेच्या दृष्टिनेच समोर येत आहेत.वसमतमध्ये तर आ.मुंदडा लोकसभेला गेले तर शिवसेनेत इच्छुकांची मोठी रांग आहे. त्यात जि.प. गटनेते अंकुश आहेर, सुनील काळे, अक्षय मुंदडा आदींचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे इच्छुक जयप्रकाश दांडेगावकर यांना राज्य साखर संघाचे अध्यक्षपद देवून पक्षाने बळ दिले. त्यांच्यासह विधानसभेला राजू पाटील नवघरे नावाचा नवा चेहराही चर्चेत आला आहे. भाजपचे शिवाजी जाधव यांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. लोकसभा की विधानसभा याच विवंचनेत त्यांना वेळ खर्ची घालावा लागत आहे.युती-आघाडीचे कोणतेच गणित न लावता इच्छुक आतापासूनच उर्जा वाया घालवत आहेत, याचे आश्चर्य मतदारांनाही वाटत आहे. जर-तरच्या या राजकारणात शेवटी हाती काय लागेल? हा प्रश्नच आहे.लोकसभा निवडणुकीतच आघाडी व युतीची गणिते स्पष्ट होणार आहेत. त्यानंतरच विधानसभेच्या जागा कोणत्या पक्षाला सुटतील, हेही जवळपास स्पष्ट होणार आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्याही आपोआपच कमी होण्यास मदत होणार आहे. अन्यथा निवडणुकीनंतर कोलांटउड्या खाणाºयांची संख्याही वाढू शकते. कदाचित लोकसभेपूर्वीच अनेकजण हा डाव आखतील, अशी चिन्हेही दिसू लागली आहेत. मात्र लोकसभेलाच तगडे उमेदवार रिंगणात उतरविण्यासाठी आधी सर्वांनाच मेहनत घ्यावी लागणार आहे, हे निश्चित.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliticsराजकारण