शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मार्च महिन्यातही 'फुल डे' शाळा भरतेय

By admin | Updated: March 4, 2015 15:42 IST

दरवर्षी /मार्च महिना लागला की शाळा या 'फुल डे' ऐवजी 'हाफ डे' होतात; परंतु यावर्षी मार्च महिना लागूनही शाळा पूर्णवेळ भरत आहे. यामुळे शिक्षकांत नाराजीचा सूर पसरला आहे.

कळमनुरी : /दरवर्षी /मार्च महिना लागला की शाळा या 'फुल डे' ऐवजी 'हाफ डे' होतात; परंतु यावर्षी मार्च महिना लागूनही शाळा पूर्णवेळ भरत आहे. यामुळे शिक्षकांत नाराजीचा सूर पसरला आहे. कित्येक दिवसांपासून मार्च महिना लागला की शाळा अर्धवेळ दुपारपर्यंत भरविल्या जाते. यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने मागील १५ ते २0 दिवसांपासून उकाडा जाणवत आहे. तसेच अनेक गावांत पिण्यासाठी पाणी नाही. काही शाळेतही तीच गत आहे. एकीकडे पाण्याची समस्या तर दुसरीकडे उकाडा अशा अवस्थेतच विद्यार्थ्यांना शिकावे लागत आहे. तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा पूर्णवेळ भरत आहेत. मार्च महिन्यात पूर्णवेळ शाळा का भरत आहे? असा सवाल काही पालक शिक्षकांना करत आहेत. आम्हाला वरिष्ठांनीच सांगितले की, पूर्णवेळ शाळा करा, असे उत्तर शिक्षक देत आहेत. या दोन दिवसांत ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला. त्यामुळे काही प्रमाणात उकाडा कमी झाला; परंतु दुपारच्या वेळेला उकाडा चांगलाच जाणवत आहे. या महिन्यात विद्यार्थ्यांना दुपारच्या सुट्टय़ांची मजाही हिरावून घेतल्या गेली आहे. सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असून, उर्वरित वर्गाच्या परीक्षा या महिन्याअखेर व एप्रिल महिन्यात होतात. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी मार्च महिन्यात हाफडे शाळा भरविली जाते. परंतु यावर्षी मार्च महिन्यातही पूर्णशाळा भरत आहे. मार्च महिन्यात पूर्णवेळ शाळा का भरत आहे, असे विस्तार अधिकारी एस. बी. सोनुने यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्हाला शिक्षणाधिकार्‍यांनी पूर्णवेळ शाळा करण्यासाठी सांगितले आहे. मार्च महिन्यात अर्धवेळ शाळा करण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत आहे. /(वार्ताहर)