शहरं
Join us  
Trending Stories
1
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
2
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
3
"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
4
राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही; राष्ट्रपतींच्या 'त्या' प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
अल फलाह युनिव्हर्सिटीचे चेअरमन जावेद सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या; आता घरावर चालणार बुलडोझर 
6
“डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत येणार”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
7
एक 'अशी' शूटर बनली नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री; जिनं भारताबाहेर कायम ठेवलाय दबदबा
8
फातिमा सना शेखने फेमिनझमवर केलं भाष्य; म्हणाली, "पुरुषांना कमी दाखवणं म्हणजे..."
9
भारतीय लष्कराला बूस्ट! अमेरिकेने जेव्हलिन क्षेपणास्त्र विक्रीला दिली मंजुरी
10
प्रवाशांसाठी गुड न्यूज! कोकण रेल्वेवरील ‘या’ एक्स्प्रेसचा वेग वाढला; ४० मिनिटे लवकर पोहोचेल
11
Kandivali: कांदिवलीत भरदिवसा तिघांचा दुचाकीने येत इस्टेट एजंटवर गोळीबार!
12
सांगलीकर काळजी घ्या! ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची चार पिल्लं सापडली, एकच खळबळ
13
१७० खोल्या, क्रिकेट ग्राऊंड, गोल्फ कोर्स... बकिंघम पॅलेसपेक्षाही चार पट मोठं आहे भारतातील हे घर
14
"तुम्हाला भाजप आवडत आहे, तर तुम्ही काँग्रेसमध्ये कशाला थांबलात?"; माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने शशी थरूर यांना सुनावले
15
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
16
"ठाकरेंवर आरोप करणारी भाजपा २० वर्ष BMC मध्ये उपमहापौरपदी होती हे सोयीस्करपणे विसरते"
17
खंडोबा नवरात्र २०२५: खंडोबाचे षडरात्रोत्सव हा केवळ उत्सव नाही तर कुळाचार; पाहा पूजा साहित्य आणि व्रतविधी
18
Sonam Kapoor : सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं फोटोशूट; नवऱ्याची मजेशीर कमेंट
19
कूनोतून आली गुडन्यूज; भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म
20
नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत हाॅकफोर्सचे पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा यांना वीरमरण, जानेवारीत होणार होतं लग्न
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा अक्षयतृतीयेचा मुहूर्त हुकला; लग्नसोहळेही लॉकडाऊन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:29 IST

हिंगोली : गत दीड वर्षापासून कोरोना महामारीने सळो की पळो करून सोडले आहे. यावर्षी तरी अक्षयतृतीया मुहूर्त हुकणार ...

हिंगोली : गत दीड वर्षापासून कोरोना महामारीने सळो की पळो करून सोडले आहे. यावर्षी तरी अक्षयतृतीया मुहूर्त हुकणार नाही, असे अनेकांना वाटले होते. परंतु, गतवर्षीचीच पुनरावृत्ती यावर्षी झाल्याचे पहावयास मिळत आहे.

गत दीड वर्षापासून कोरोना महामारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. हे पाहून शासनाने संचारबंदी तसेच लाॅकडाऊन लागू केले आहे. लग्नसोहळे, मौज, धार्मिक विधी आदींना कोरोना नियम पाळण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. मंगल कार्यालयांनी १५ वऱ्हाडींपेक्षा जास्त वऱ्हाडी मंडळी जमा करू नयेत. मंडपात आलेल्या प्रत्येक मंडळींनी मास्क घातलाच पाहिजे, असेही प्रशासनाने सूचित केले आहे. कोरोनाचे नियम न पाळल्यास नियमाप्रमाणे दंडही भरावा लागेल, असेही सूचित केले आहे.

यावर्षी एप्रिल महिन्यात ८, मे महिन्यात १६ आणि जून महिन्यात ८ लग्नाचे मुहूर्त आहेत. मे महिन्यातील मुहूर्त तर केव्हाच कोरोनामुळे हातून गेले आहेत. अक्षय तृतीया मुहूर्तापर्यंत तरी लॉकडाऊन संपेल असे वाटले होते. परंतु, हा मुहूर्तही लॉकडाऊनमुळे हुकला आहे.

मे महिन्यात १६ मुहूर्त....

मे महिन्यात एकूण १६ मुहूर्त होते. हे मुहूर्तही कोरोना महामारीने हिसकावून घेेतले आहेत. आता जून महिन्यातील मुहूर्तांकडे अनेकांचे लक्ष लागले आहे, अशी माहिती संतोष गुरु अगस्ती यांनी दिली.

नियमांचे पालन करणे आवश्यक....

कोरोना महामारीमुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करावे. विनाकारण आणि विनामास्क गर्दीत प्रवेश करू नये. लग्नसोहळे व इतर धार्मिक कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे उरकून घ्यावेत.

आनंदोत्सवला कोरोनाचे नियम आडवे....

कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार उडविला आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाऊन लागू केले आहे. अक्षयतृतीया मुहूर्त चांगला असल्यामुळे अनेकांनी लग्नांची तिथीही काढली आहे. कोरोनाआधी विवाहसमारंभात आनंदोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा. यावेळेस कोरोनाचे नियम आडवे आल्याचे वधू-वरांच्या पित्याने सांगितले.

कोरोनामुळे मंगल कार्यालयांनाही फटका...

विवाह सोहळ्यासाठी वऱ्हाडी मंडळी येत आहेत. परंतु, कोरोना महामारी आणि किचकट नियमांमुळे मंगल कार्यालयांचे चालक नोंदणीच करीत नाहीत. कोरोनाचे नियम हे न परवडण्यासारखे आहेत. एकंदर पाहिले तर मंगल कार्यालयांना कोरोनामुळे फटकाच बसला आहे.

-निश्चल एंबल, अध्यक्ष, महावीर भवन, हिंगोली.