शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

बालक नातेवाईकांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 23:50 IST

शहरातून अचानक बेपत्ता झालेला अमोल राऊत या बालकाचा शोध लागला असून तो सध्या नातेवाईकाकडे सुखरूप आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातून अचानक बेपत्ता झालेला अमोल राऊत या बालकाचा शोध लागला असून तो सध्या नातेवाईकाकडे सुखरूप आहे. बडनेरा येथील रेल्वे पोलिसांनी १० डिसेंबर रोजी हिंगोली शहर पोलीस व नातेवाईकांना संपर्क केला. स्वत:हूनच मित्रांसोबत फिरत गेलो होतो, असे अमोल सांगत आहे.हिंगोलीतील अमोल दादाराव राऊत (वय १०) हा ९ डिसेंबर रोजी शाळेत गेला, परंतु तो घरी परतलाच नाही. वडील दादाराव राऊत यांनी हिंगोली शहर ठाण्यात मुलास पळवून नेल्याची तक्रारही दिली होती. पोलीस यंत्रणा, नातेवाईक तसेच शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनीही त्याचा शोध घेतला. अखेर तो रविवारी बडनेरा रेल्वेस्थानकात सापडला. तेथील पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क केला होता. ९ डिसेंबर रोजी शाळा सुटल्यानंतर अमोल हिंगोली येथे सुरू असलेल्या संत नामदेव कवायत मैदानावर तो क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी गेला होता. काही शालेय खेळाडूंसोबत मैत्री झाली. तो त्यांच्यासोबतच निघून गेला. बडनेरा रेल्वेस्थानकावर काही क्रीडा स्पर्धेच्या शिक्षकांनी बालकाची विचारपूस केली असता तो चुकून रेल्वेत आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क करत बालकास त्यांच्या स्वाधीन केले. रेल्वे पोलिसांनी हिंगोली पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर मुलास नातेवाईकांच्या स्वाधीन केले.शाळेच्या प्रांगणातून बालकास कोणी पळवून नेले नसून तो स्वत:हूनच त्याच्या मित्रांसोबत निघून गेला. त्यास नातेवाईकांच्या स्वाधीन केले असून सध्या अमोल सुखरूप आहे, असे संस्थेचे सचिव अनिलकुमार भारूका यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.