शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

संत नामदेवांचे वंशज म्हणून सरकारची दिशाभूल; नर्सी येथील मंदिर समिती अध्यक्षांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 20:38 IST

इतर दिंड्यांना बसने जाण्याची परवानगी मिळाली. या दिंडीलाच का मिळाली नाही, असा प्रश्न संत नामदेव मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे यांनी केला.

ठळक मुद्दे पंढरपुरात नामदेवांचे वंशज म्हणून काहींनी दिशाभूल चालविल्याने त्याला शासन बळी पडले.

हिंगोली : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील नर्सी नामदेव येथे झाला. ते संत ज्ञानेश्वर यांच्या समकालीन व विठ्ठलाचे सर्वात लाडके भक्त म्हणून सर्वपरिचित असताना शासनाने पालखीला परवानगी नाकारली. पंढरपुरात नामदेवांचे वंशज म्हणून काहींनी दिशाभूल चालविल्याने त्याला शासन बळी पडले. इतर दिंड्यांना बसने जाण्याची परवानगी मिळाली. या दिंडीलाच का मिळाली नाही, असा प्रश्न संत नामदेव मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे यांनी केला.

राज्यामध्ये सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे यावर्षी पायदळ दिंडी सोहळ्याला प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली. राज्यभरातील काही प्रमुख पालख्यांनाच परवानगी देऊन त्या समारंभपूर्वक पंढरपूर येथे नेण्यासाठी राज्य शासनाकडून शिवशाही बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र यामध्ये श्रीक्षेत्र नर्सी नामदेव येथील राष्ट्रीय संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या पालखीला परवानगी देण्यात आली नाही.  संत नामदेव यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. अशा या थोर संताच्या पालखीला आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाण्यासाठी परवानगी न दिल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

शिंदे म्हणाले, परवानगीची मागणी येथील संस्थान व स्थानिक लोकप्रतिनिधींनी राज्य शासनाकडे वारंवार करूनही डावलण्यात आले. प्रमुख संतांच्या पालखीचे स्वागत करण्याचा मान मागील अनेक वर्षांपासून नर्सी येथील संत नामदेवाच्या पालखीला आहे. मात्र हा मान पंढरपूर येथील नामदेवाचे वंशज असल्याचे सांगून काहीजण दिशाभूल करीत आहेत, असाही आरोप त्यांनी केला. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बुधवारी एक बैठक झाली.  वारकरी संप्रदायातील मंडळी आगामी काळात याप्रश्नी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

...अखेर जीपमधून नेल्या पादुका३0 जून रोजी स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घेत केवळ तीन वारकरी नामदेवांच्या पादुका घेऊन एका खाजगी जीपमधून पंढरपूरकडे रवाना झाले. संत नामदेव महाराजांच्या पालखीची मागील अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. संत नामदेवांच्या जन्मस्थळापासून निघालेल्या या पालखी दिंडी सोहळ्यामध्ये हजारो वारकऱ्यांचा सहभाग असतो. या पालखी सोहळ्याचा तीन ठिकाणी भव्य रिंगण सोहळा होतो, तर पंढरपूरमध्ये संत नामदेव महाराज पालखीकडून पुष्प प्रदक्षिणा करण्यात येते. 

टॅग्स :PandharpurपंढरपूरHingoliहिंगोली