शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लघुसिंचनच्या कार्यकारी अभियंत्यास नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:20 IST

वारंवार सूचना देवूनही जलयुक्तच्या कामांना गती नाही. काही अधिकारी तर यात लक्षच घालत नाहीत. त्यामुळे गतवर्षीचीच कामे होत नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये अशा अधिकाऱ्यांनी स्वत:च आढावा द्यावा, असे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी खडसावले. तर लघुसिंचनच्या कार्यकारी अभियंत्याचे एक दिवसाचे वेतन कापून नोटीस देण्यास सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वारंवार सूचना देवूनही जलयुक्तच्या कामांना गती नाही. काही अधिकारी तर यात लक्षच घालत नाहीत. त्यामुळे गतवर्षीचीच कामे होत नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये अशा अधिकाऱ्यांनी स्वत:च आढावा द्यावा, असे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी खडसावले. तर लघुसिंचनच्या कार्यकारी अभियंत्याचे एक दिवसाचे वेतन कापून नोटीस देण्यास सांगितले.जलयुक्त शिवार योजनेचा व्हीसीद्वारे आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. यामध्ये जि.प.चा लघुसिंचन विभाग, स्थानिक स्तर विभाग कामेच करीत नसल्याचे आढळले. त्यातच जि.प. लघुसिंचनच्या कार्यकारी अभियंत्यांची गैरहजेरी तर जिल्हाधिकाºयांना चांगलीच खटकली. कामेही नाहीत अन् गैरहजरही राहील्याने ते संतापले होते. एकूण ८० गावांतील चित्र पाहता खर्चाचे प्रमाण अतिशय कमी आहे. तर पुढील दोन महिनेच हाती उरले आहेत. एकूण मंजूर असलेल्या २४७७ कामांपैकी ९१८ कामे पूर्ण झाली आहेत. त्यावर ६.५२ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. तर ५१६ कामे नव्याने सुरू झाली असून, ती प्रगतीत आहेत. एकूण १६७० कामांच्याच निविदा निघाल्या होत्या. त्यात वरीलप्रमाणे चित्र असल्याने यंदा जलयुक्तची गती वाढविणे गरजेचे आहे.जलयुक्तमध्ये कृषी विभागाला विविध प्रकारची १६३९ कामे मंजूर आहेत. त्यापैकी ८०८ कामे झाली. मात्र यातही ६०० ठिबक व तूषार संचाचीच कामे आहेत. वनविभागाच्या १५४ पैकी १०५ कामांमुळे चांगली स्थिती दिसून आली. जि.प.च्या लघूसिंचन विभागाला ८३ पैकी केवळ ५ कामे पूर्ण करता आली. भूजलसर्व्हेक्षण विभागाची रिचार्ज शाफ्टची ११४ कामे सुरू करता आली नाहीत. पाणीपुरवठा विभागाचीही हीच गत आहे. सिमेंटनाला बंधारे व नाला खोलीकरणाच्या ९७ कामांना अजूनही श्रीगणेशा नाही. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी चांगलाच संताप व्यक्त करून अधिकाºयांना धारेवर धरले.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीHingoliहिंगोली