शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

घरांना आग लागल्याने लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:49 IST

हिंगोली तालुक्यातील जयपूर वाडी गावातील दोन घरांना आग लागल्याची घटना ५ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान घडली. गावात पाणी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी दोन कि.मी. अंतरावरून पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्ककनेरगाव नाका : हिंगोली तालुक्यातील जयपूर वाडी गावातील दोन घरांना आग लागल्याची घटना ५ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान घडली. गावात पाणी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी दोन कि.मी. अंतरावरून पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.जयपूरवाडी येथील श्रीराम कºहाळे यांच्या लाकडी माळवदाच्या घराला आग लागली. घरातील देवाच्या देव्हाऱ्यातील दिव्याने लाकडाच्या खांबाला आग लागल्याचा अंदाज आहे. त्यानंतर आगीने उग्र रुप धारण केल्याने पाहता पाहता शेजारील नागोजी सूर्याजी गाढे यांच्याही घराला आग लागली. या आगीत श्रीराम कºहाळे यांचे माळवदाचे घर कोसळल्याने घरातील सर्व साहित्य माळवदाखाली दबले गेले. त्यात कºहाळे यांचे ३ ते ४ लाखांचे नुकसान झाले आहे. तर नागोजी सूर्याजी गाढे यांचे ७० ते ८० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. आग विझविण्यासाठी सर्व गाव एकवटले होते. मात्र गावात तीव्र पाणीटंचाई असल्याने पाणी उपलब्ध नव्हते. ग्रामस्थांनी दोन कि.मी. अंतरावरुन पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी १ वाजता दाखल झाले. अग्निशमन दलाचे पथक येण्यापूर्वीच ग्रामस्थांनी आग विझवली होती. येथील परिसरात यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने जयपूर वाडीमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. गावात पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे पिण्यासाठी पाणी नाही तर, आग विझवण्यासाठी पाणी आणायचे कुठून असा प्रश्न ग्रामस्थांना पडला होता. याही परिस्थितीत आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले.शॉटसर्किटमुळे आखाडा जळून खाक४शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील भवानीच्या माळाजवळील शेतात ४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान शॉटसर्किटमुळे पेट घेऊन आखाड्यातील विविध शेतीपयोगी औजारे जळून खाक झाली आहेत. कुठलीही जीवित हानी झाली नाही. शिरडशहापूर येथील गट. क्र. ५३५ मधील चंद्रहार लक्ष्मण वाहटळे यांच्या शेतातील आखाड्याजवळील विजेच्या तारांचे घर्षण होऊन धुऱ्यावरील गवताने पेट घेतला. पाहता पाहता सर्वत्र आग लागली. यात आखाड्याने पेट घेतला. आखाड्यातील विविध शेती औजारे, ठिबक संच, पाईप इ. साहित्य जळून खाक झाले असून जवळपास एक लाख रुपयांच्या वर नुकसान झाले आहे.