शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जनसुविधा योजनेच्या यादीवरून सदस्य संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 23:54 IST

जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या जनसुविधा योजनेत जि.प.सदस्यांच्या शिफारसी डावलून खासदार व आमदारांच्या शिफारसींनाच प्राधान्य दिले. शिवाय ते देताना नियमांनाही तिलांजली देण्याचा प्रकार घडल्याने जाणीवपूर्वक असे करण्याचा प्रकार पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून होत असल्याचा आरोप सदस्यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या जनसुविधा योजनेत जि.प.सदस्यांच्या शिफारसी डावलून खासदार व आमदारांच्या शिफारसींनाच प्राधान्य दिले. शिवाय ते देताना नियमांनाही तिलांजली देण्याचा प्रकार घडल्याने जाणीवपूर्वक असे करण्याचा प्रकार पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून होत असल्याचा आरोप सदस्यांनी केला.हिंगोली जिल्हा परिषदेला जनसुविधा योजनेत साडेचार कोटींच्या कामांसह पत्र प्राप्त झाले आहे. प्रशांत ठाकरे या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्हॉटसअ‍ॅपवर हे पत्र पाठवून जिल्हा नियोजन समितीच्या प्रशासकीय मान्यतेस सादर करण्यास सांगितले. जि.प.च्या पंचायत विभागानेही मग या पत्राचा संदर्भ देत थेट जिल्हाधिकाºयांना पत्र देत या यादीची खात्री करून पुढील कारवाई व्हावी, असे कळविले. मुळात ज्या पत्राबद्दलच संभ्रम आहे, त्यावर एवढ्या तत्काळ जि.प.ने पत्र दिलेच कसे? असा सदस्यांचा सवाल आहे. त्यातही ही तत्परता दाखविताना जि.प.च्या पदाधिकारी किंवा सदस्यांना विश्वासात घेतले नाही. जिल्हा नियोजन समितीवर जवळपास २0 जि.प.सदस्य आहेत. त्यामुळे कोणत्याही बाबीसाठी जिल्हा परिषद सदस्यांचे मत ग्राह्य धरणे अपेक्षित आहे. इतर सदस्यांच्या शिफारसी तर कधी कुणी विचारात घेतही नाही. निदान नियोजन समितीवर असलेल्या सदस्यांना तरी सन्मान मिळेल, असे अपेक्षित होते. मात्र आमच्या पत्रांनाही केराची टोपली दाखविली तर नियोजन समिती काय फक्त वरिष्ठ लोकप्रतिनिधीच चालविणार आहेत काय? असा सवाल जि.प.सदस्या सारिका खिल्लारे यांनी केला.राकाँचे गटनेते मनीष आखरे म्हणाले, एकतर जि.प.ने मान्यता घेवून पाठविलेल्या यादीतून गावांची निवड करणे अपेक्षित आहे. मात्र ही यादी पाहून तसे झाले नसल्याचेच दिसत आहे. दुसरे म्हणजे या यादीत असलेल्या अनेक गावांना २0 लाखांपेक्षा जास्त निधीची शिफारस केली. जेव्हा की या योजनेत कमाल २0 लाखांचीच मर्यादा आहे. मग चाळीस-चाळीस लाखांचा निधी कशासाठी ? असा सवाल त्यांनी केला.या यादीवरून इतरही अनेक सदस्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यापूर्वी कधीच कुणी जि.प.च्या अधिकारावर असे गंडांतर आणले नाही. ही मंडळी अशीच अतिरेकी भूमिका घेणार असेल तर जिल्हा नियोजन समितीत असहकाराची भूमिका घेतली जाईल, असे सांगण्यात आले. जि.प. सदस्यांची एकेका गावावर बोळवण करून खासदार, आमदारांनीच मोठ्या प्रमाणात कामे लाटली. जि.प.कडेच हा निधी येतो. त्यामुळे त्याची प्रशासकीय मान्यता फेटाळण्यासह इतर सर्व बाबी जि.प.सदस्य करू शकतात, याचेही भान या पदाधिकाºयांना राहणार नसेल तर विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम भोगायला लागतील, याचे भान ठेवावे असा इशाराही काहींनी दिला. आघाडीच्या काळात असे कधी घडले नाही. युतीच्या काळात जि.प.ला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. काहींनी तर यांना न्यायालयात खेचून सर्वच बाबतीत होणारी लूडबूड बंद करण्याची गरज असल्याचे सांगितले.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद