शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ निधीवरून जि.प.ची सभा निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:31 IST

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा प्रशासनाने थेट नावांच्या यादीसह १.९८ कोटींच्या निधीचा दिलेला आदेश आता चांगलाच वादात सापडणार आहे, हे निश्चित झाले आहे. मुळात जिल्हा प्रशासन शिफारस विचारार्थ पाठवू शकते, येथे थेट आदेशच देत दबावतंत्राचा केलेला वापर वाया जाण्याची भीती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा प्रशासनाने थेट नावांच्या यादीसह १.९८ कोटींच्या निधीचा दिलेला आदेश आता चांगलाच वादात सापडणार आहे, हे निश्चित झाले आहे. मुळात जिल्हा प्रशासन शिफारस विचारार्थ पाठवू शकते, येथे थेट आदेशच देत दबावतंत्राचा केलेला वापर वाया जाण्याची भीती आहे.एरवी व्यासपीठावरून कार्यकर्त्यांना बळ देण्याची भाषा करणाऱ्या आमदार, खासदारांना निधी मात्र आपल्याच पारड्यात हवा असतो. जि.प.च्या अनेक योजना राज्य शासनाच्या विभागांकडे हलवून आमदारांनी जि.प.सदस्यांचे आधीच पंख छाटले आहेत. तर वित्त आयोग थेट ग्रामपंचायतींना देवून केंद्र शासनाने त्यात भर घातली आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये जि.प.सदस्यांना वापरून घेणाºया आमदारांनी जि.प.च्या कामात ढवळाढवळ करू नये, अशी सदस्यांची रास्त भावना आहे. हा अतिरेक वाढला तर आमदारांनाही भविष्यात धोक्याची घंटा होवू शकते, हे कोणीच विचारात घ्यायला तयार नाही. तर काही ठिकाणी जि.प.पदाधिकाºयांनी जिल्हा नियोजन समितीतील आपल्या संख्याबळाचा वापर करून आमदार-खासदारांनाही जेरीस आणले आहे. हिंगोलीही त्याकडे आता वाटचाल करीत आहे. कारण पालकमंत्र्यांचाही वाढता हस्तक्षेप याला कारणीभूत ठरत आहे.डीपीसीवर जि.प.चे २१ सदस्य आहेत. मात्र जि.प.चेही वेगळे सभागृह आहे. विविध समित्या आहेत. तेथेच निधीचे नियोजन करणे अपेक्षित आहे. मात्र थेट कामांची यादी देवून निधी वितरण करून जिल्हा प्रशासन पालकमंत्री, आमदार, खासदारांच्या दबावाला बळी पडत असल्याची भावना व्यक्त होत आहे.दलितवस्तीतही हस्तक्षेप कशाला?एकीकडे डीपीसीच्या निधीवर हक्क सांगता तर दलितवस्तीत जि.प.ला येणाºया निधीत हस्तक्षेप कशाला? मग यातील शिफारसीतील कामे आम्ही काढून घेवू. जे होईल, ते पाहू असा गर्भित इशाराही काहीजण देत आहेत.एकीकडे निवडणुका आल्या की, कार्यकर्त्यांना बळ देण्याची भाषा करणाºया वरिष्ठ नेत्यांना आगामी काळातील निवडणुका तोंडावर असतानाही जि.प.सदस्यांची किंमत कळत नाही. त्यामुळे अनेकांनी येत्या निवडणुकीत इंगा दाखविण्याची भाषा सुरू केली आहे. ही बाब स्थानिकआमदारांना आगामी निवडणुकीत भोगावी लागू शकते. पालकमंत्र्यांच्या नावाखाली ही मंडळी रोब जमवत असली तरीही पालकमंत्री येथून निवडणूक लढवणार नाहीत. याची जाणीवही काहीजण खाजगीत करून देत आहेत.काही सदस्यांनी जि.प.च्या सभेत हा प्रश्न न सुटल्यास वाशिम, चंद्रपूर जि.प.च्या धर्तीवर न्यायालयात जाण्याचीही तयारी करू, असे सांगितल्याने प्रश्न चिघळेल असे दिसते.‘सुचविलेल्या कामांवरच निधी खर्च व्हावा’डीपीसीकडूनच मी ५0५४ या हेडमधील कामे यादीद्वारे सुचविली आहेत. हा निधी जि.प.ला इतर कामांवर खर्च करता येणार नाही. जर ही कामे करण्याची त्यांची तयारी नसेल तर इतर यंत्रणेकडून काम करून घेता येईल. मात्र जि.प.लाही कामे न केल्यास निधी परत करावा लागेल, असे जिल्हाधिकारी अनिल भंडारी प्रतिक्रिया देताना म्हणाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद