शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

खेळीमेळीच्या वातावरणात हिंगोली न.प.ची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:33 IST

नगरपालिकेच्या आजच्या सभेत विविध विषयांवर चर्चा करून सर्वच ठराव एकमताने पारित करण्यात आले. स्वच्छता, डेंग्यूच्या पार्श्वभूमिवर धूरफवारणी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. त्यात धूरफवारणी सुरू केल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देविविध ठराव पारितरस्त्यावर बिल्डिंग मटेरियल टाकल्यास दंड लावणार

हिंगोली : नगरपालिकेच्या आजच्या सभेत विविध विषयांवर चर्चा करून सर्वच ठराव एकमताने पारित करण्यात आले. स्वच्छता, डेंग्यूच्या पार्श्वभूमिवर धूरफवारणी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. त्यात धूरफवारणी सुरू केल्याचे सांगण्यात आले.नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी विविध योजनांतील कामांना मुदतवाढ देण्याच्या मुद्यावर नगरसेवकांनी कामे व मुदतवाढीबाबत विचारणा केली. तर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील २ कोटींतून होणाऱ्या कामांची यादी वाचवून दाखविण्यात आली. तर लाड कमिटीच्या शिफारसींनुसार कर्मचा-याच्या वारसास नियुक्ती देण्याच्या प्रकरणांवरही चर्चा झाली. तर सेवानिवृत्त कर्मचा-यांची सेवा करार पद्धतीने घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.हिंगोलीत कयाधू नदीवर बंधारे बांधून शहरानजीकच्या भागात पाणीपातळी वाढण्यासाठी कामे घेण्याचे ठरले. तर खडकपुरा येथे अण्णा भाऊ साठे समाजमंदिराच्या नवीन बांधकामाचा ठराव झाला. प्रभाग क्र.३ मध्ये राष्ट्रध्वज उभारणीचा ठराव नगरसेवक नरसिंग नायक व अनिता गुट्टे यांनी मांडला होता. त्यांनीच या बाबीच्या सन्मानाची जबाबदारी स्वीकारल्यास हे काम घेण्यास मंजुरी देण्यात आली. तर सिद्धविनायक गणपती मंदिराच्या खुल्या जागेत टीनशेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. हिंगोली शहरात स्वच्छ महाराष्ट्र अभियानात ३ स्टार रेटिंग आदीबाबत ठराव घेण्यात आला.शहरात पडलेले बिल्डिंग मटेरियल दंडाची रक्कम ठरवून वाहतूक खर्च घेण्यासही मान्यता दिली. यात दंडाच्या रक्कमेवर एकवाक्यता नसल्याने प्रशासनाने निर्णय घेण्यास सांगितले. प्रभाग क्र.१६ मध्ये पथदिवे बसविण्याची मागणी नगरसेविका स. नाजनिन जावेद यांनी केली होती. त्यास मान्यता दिली.डेंग्यूमुळे धूर फवारणीच्या मागणीला जोरस्वच्छता अभियानाच्या यशस्वीतेबाबत संबंधित नगरसेवकाकडून प्रमाणपत्र घेण्यापूर्वी त्याच्या भागातील अडचणी जाणून घेण्याची मागणी नगरसेविका नाईक यांनी केली. संबंधित नगरसेवकाने सांगितलेली स्वच्छतेची कामेही झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कंत्राटी कर्मचारी निविदेद्वारे नेमले तरीही कर्मचारीसंख्या अपुरीच असते. स्वच्छतेची समस्या घेवून गेल्यावर हेच ऐकायला मिळते, असा आरोप स.नाजनीन यांनी केला. तर पंधरा-पंधरा दिवस सफाई होत नसल्याचे नगरसेवक कय्यूम यांनी म्हटले. त्यावर लगेच कारवाईचा आदेश नगराध्यक्ष बांगर यांनी दिला. अनेक नगरसेवकांनी शहरात सुरू असलेल्या डेंग्यूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेसोबतच धूरफवारणीची मागणी केली. अशी फवारणी सुरू असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीMuncipal Corporationनगर पालिका