या बैठकीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, डॉ. प्रेमकुमार ठोंबरे, डॉ. देवेंद्र जयभाये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढविणे, ३० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करून घेणे, अँटिजन व आरटीपीसीआर तपासण्या वाढविणे, शासकीय कार्यालयातील सर्व कर्मचारी, छोटे दुकानदार व ग्रामस्थांच्या तपासण्या सुरू ठेवणे, गरोदर मातांची तपासणी करणे, बालकांचे नियमितचे लसीकरण पूर्ण करणे, पावसाळ्याचे दिवस असल्याने पाणी शुद्धिकरणासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर करणे, ताप रोग सर्वेक्षण करणे, रक्त नमुने घेणे, पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेणे, रुग्णवाहिका सुस्थितीत ठेवणे, आदींबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. साथरोगाचा काळ असल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून रुग्णांना वेळेवर औषधोपचार देणे बंधनकारक असून, कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला. बैठकीसाठी शेख अन्वर, शैलेश मुंदडा, डॉ. अलोक गट्टू, डॉ. शिंदे, डॉ. जगताप, डॉ. स्नेहल बोंबळे, डॉ. शुभांगी वाणी, आदी उपस्थित होते.
लसीकरण आणि तपासण्यांसाठी डॉक्टरांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:21 IST