शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ प्रचंड मोर्चा

By admin | Updated: November 11, 2014 15:33 IST

जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ सोमवारी निघालेल्या मोर्चामध्ये शहराच्या विविध भागांतील आंबेडकरी जनता मोठय़ा संख्येने सहभागी झाली होती

शांतता व सनदशीर मार्गाने मांडली प्रखर निषेधाची भूमिकाजवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ सोमवारी निघालेल्या मोर्चामध्ये शहराच्या विविध भागांतील आंबेडकरी जनता मोठय़ा संख्येने सहभागी झाली होती. सकाळी ११ वाजल्यापासूनच विविध भागातील समुदायाने लोक एकत्रित येत होते. प्रचंड मोठी संख्या व मोर्चातील प्रखर निषेधाची भूमिका लक्षवेधी होती. परंतु तितक्याच शांतता व सनदशीर मार्गाने हा मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला. नांदेड : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथे झालेल्या दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ नांदेडमध्ये सोमवारी काढण्यात आलेला महामोर्चा शांततेत पार पडला. हजारोंच्या संख्येने या मोर्चात तरूण व महिला सहभागी झाल्या होत्या. जवखेडा येथील जाधव कुटुंबियांच्या मारेकर्‍यांना त्वरित अटक करावी, या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी आदी मागण्यांसाठी तरोडा, देगावचाळ, हडको, इतवारा आदी भागातून मोर्चा काढण्यात आला होता. दुपारी १२ च्या सुमाराच्या या मोर्चांना प्रारंभ झाला. वजिराबाद चौकात विविध भागातून निघालेल्या या मोर्चाचे एकत्रिकरण झाल्यानंतर छत्रपती शिवाजी चौक, शासकीय रूग्णालय मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. महात्मा फुले पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चात विविध राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. निळ्या ध्वजासह पंचरंगी ध्वज हातात घेवून तरूण वर्ग महिलांनी शासनाच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी केली.जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आल्यानंतर या मोर्चाला भदंत पय्याबोधी, भदंत संघपाल, भदंत आनंदबोधी यांनी मार्गदर्शन केले. बुद्धांच्या शांततेच्या मार्गाने निषेध करणे हे आंबेडकरी अनुयायांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. या मोर्चाला कुठेही गालबोट लावू नका असे सांगताना त्यांनी आक्रमक तरूण वर्गाला शांत केले. या मोर्चात भदंत पय्याबोधी, भदंत संघपाल, भदंत शीलरत्न, भदंत जीनरत्न, भदंत संघप्रिय, भदंत आनंदबोधी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. कोणत्याही पक्ष अथवा संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा नसल्यामुळे तरूण वर्गाने मोठय़ा संख्येने हजेरी लावली होती. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना निवेदन दिल्यानंतर त्याबाबतची माहिती मोर्चेकर्‍यांना रमेश सोनाळे, सुभाष रायबोले यांनी दिली. या मोर्चात आ. अमरनाथ राजूरकर, बापूराव गजभारे, प्रफुल्ल सावंत, रमेश सोनाळे, श्याम निलंगेकर, गौतम गजभारे, रमेश गोडबोले, डॉ. करूणा जमदाडे, रमेश सरोदे, नरेंद्र गायकवाड, संघरत्न खंदारे, सुखदेव चिखलीकर, बाळू राऊत, प्रकाश कामळजकर, मनीष कावळे, राज सोनसळे, साहेबराव गायकवाड, मोहन गर्दनमारे, दुष्यंत सोनाळे, रवी कसबे, अजय शेळके, राजू लांडगे, संघरत्न कांबळे, गणेश तादलापूरकर, प्रकाश वागरे, दिगांबर ढोले, बाळासाहेब देशमुख, गौतम पवार, प्रीतम जोंधळे, अनिल बिर्‍हाडे, संदीप सोनकांबळे, डी. पी. गायकवाड, मंगेश कदम, उपेंद्र तायडे, श्याम कांबळे, जयपाल ढवळे, विजयानंद पोवळे, देवानंद सरोदे, प्रशांत इंगोले, शिल्पा नरवाडे, अनिता हिंगोले, महादेवी मठपती, अपर्णा साळवे, लक्ष्मी वाघमारे, सुषमा थोरात आदींची उपस्थिती होती. अप्पर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांच्यासह सहायक पोलिस अधीक्षक देशमुख यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा जिल्हा कचेरीसमोर हजर होता. /(प्रतिनिधी)