शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मंगल कार्यालयांना आता सावध, सावधान घटिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:28 IST

हिंगोली : कोरोना महामारीचे रुग्ण दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागले आहेत. विवाह मुहूर्त जवळपास ३३ असून मंगल कार्यालयांना ५० वऱ्हाडी ...

हिंगोली : कोरोना महामारीचे रुग्ण दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागले आहेत. विवाह मुहूर्त जवळपास ३३ असून मंगल कार्यालयांना ५० वऱ्हाडी मंडळींसाठीच परवानगी दिली आहे. त्यामुळे मंगल कार्यालयांना ‘सावध, सावधान घटिका’ पाळावी लागणार आहे.

गतवर्षीप्रमाणे याही वर्षी कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. गतवर्षी ६५ ते ६७ विवाह मुहूर्त होते. परंतु, कोरोनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक विवाह घरच्या घरी आटोपून घ्यावे लागले. यावर्षी विवाह मुहूर्त ३३ असले तरी त्यासाठी शासनाने काही अटी घातल्या आहेत. मंगल कार्यालयांनी ५० वऱ्हाडींनाच परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचे प्रमाण वाढल्याचे पाहून अनेक वधू-वरांच्या पित्यांनी विवाह मुहूर्त रद्द केल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. रोज चार-पाच जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून कडक निर्बंध घातले आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मंगल कार्यालयातील नियम

मंगल कार्यालयांनी ५० व्यक्तींनाच परवानगी द्यावी. मंगल कार्यालयाशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे. लसीकरण न झाल्यास त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगावे, जिल्हा प्रशासनाने घालून दिलेले सर्व नियम बंधनकारक असतील, अशी माहिती निश्चल यंबल यांनी दिली.

असे आहेत विवाह मुहूर्त एप्रिल महिना : १७, २२, २४, २५, २६, २८, २९, ३०. (८ मुहूर्त). मे महिना : १, २, ३, ४, ५, ८, १३, १५, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१ (१६ मुहूर्त). जून महिना : ४, ६, १३, १६, २०, २६, २७, २८ (८ मुहूर्त) असल्याची माहिती रेणुकादासगुरू कंधारकर यांनी दिली.