पूनम माधव कोठुळे (रा. फाळेगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. मे २०१५ मध्ये पूनम हिचे लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवस तिला चांगले वागविण्यात आले. त्यानंतर नोव्हेंबर २०१८ ते ७ सप्टेंबर २०२१ या काळात पूनम हिला घर बांधकामासाठी व दुचाकी घेण्यासाठी माहेराहून ५० हजार रुपये घेऊन ये म्हणून छळ केला जात होता. पैसे घेऊन ये नाही तर तुला घरात राहू देत नाही, असे म्हणून थापडाबुक्क्यांनी मारहाण केली. यातूनच तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी आनंता शिवबा डवले (रा. दरेगाव, ता. औंढा) यांच्या फिर्यादीवरून माधव रामजी कोठुळे याच्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तपास पोलीस उपनिरीक्षक के.डी. पोटे करीत आहेत.
५० हजारांसाठी विवाहितेस केले आत्महत्येस प्रवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:29 IST