शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली पालिकेच्या सभेत रंगले मानापमाननाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 11:40 IST

नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज मानापमान नाट्य चांगलेच रंगले. मात्र सगळे काही निमूटपणे सहन करीत अखेर खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पाडत स्वत:च्याच पायावर दगड मारून घेण्याचे नगरसेवकांनी टाळले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज मानापमान नाट्य चांगलेच रंगले. मात्र सगळे काही निमूटपणे सहन करीत अखेर खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पाडत स्वत:च्याच पायावर दगड मारून घेण्याचे नगरसेवकांनी टाळले.नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, सीओ रामदास पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत नगरसेवक सुरुवातीपासूनच आक्रमक होते. या आक्रमकतेमुळे सभेच्या सुरुवातीलाच शाब्दीक चकमकी झाल्या. त्यामुळे बंद दरवाजा आड होणारे नगरसेवक बाहेर आले. त्यानंतर सत्ताधारी व विरोधकांत ‘तू-तू... मै-मै..’ झाली. यात सत्ताधाºयांनी मग नगरसेविकांऐवजी त्यांचे प्रतिनिधी कसे आले? असा सवाल करताच नूर पालटला. मात्र सभेत नगरसेवक आक्रमकच होते. शिवाय विकास कामांच्या निविदा काढण्यास मंजुरी असा मोघम ठराव न घेता प्रत्येक काम वाचवून दाखविण्याची वेळ प्रशासनावर पहिल्यांदाच आली. नंतर यातील कामे वाढली नाही पाहिजे, असा गर्भित इशाराही काही नगरसेवकांनी दिला. ठरावीक भागातच कामे होत असल्याचा आरोप करून काही नगरसेवकांची नाराजी मागील काही दिवसांपासून सभागृहाबाहेर उमटतच होती. आज समान निधी वाटपाची मागणी करून त्यावर जोरदार चर्चाही घडवून आणण्यात यश मिळविले. तर स्वच्छतेचे आॅटोही असेच काही भागातच फिरत आहेत. काही भागात ते येतच नसल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला. यात बदल करून सर्व भागातील साफसफाईला सारखे प्राधान्य देण्याची मागणीही केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवर नगरपालिकेचा निधी टाकण्यास विरोध करून ही कामे रद्द करण्यात आली. तर शहरातील रस्त्यांवर मुरुम टाकण्याची निविदाही रद्द केल्याचे सांगण्यात आले. इंदिरा गांधी पुतळ्याच्या सुशोभिकरणाची मागणीही केली. त्यावर हे काम करण्यात येईल, असे सांगण्यात आले. तर आजम कॉलनी भागातील शॉपिंग कॉम्प्लेक्सला भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्याचा ठराव घेण्यात आला. नगरसेवक नेहालभैय्या व नगरसेविका स. नाजनीन जावेद यांनी ही मागणी केली.एकंदर आजच्या सभेत बºयाच जणांनी पदाधिकारी अथवा प्रशासनाशी असलेले उट्टे काढण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना थोडी दमछाक सोसावी लागली. मात्र विविध कामांचे ठराव या सभेत होणार असल्याने ही सभाच उधळण्याचा त्यांचा प्रयत्न मात्र फसला.इंदिरा गांधी चौक ते पोलीस ठाण्यापर्यंत साईड पट्टा रस्ता, डम्पिंग ग्राऊंडवर अंतर्गत, रात्रनिवाºयास जागा घेवून बचत गटास चालवायला देणे, १ एप्रिलपासून शहरात युजर चार्जेस कर लावणे, न.प.च्या अभ्यासिकेसाठी शुल्क व खुर्च्या खरेदी, न.प.च्या विविध विभागांच्या वार्षिक निविदा काढणेरमाई घरकुल योजनेतील अर्ज मंजुरीसाठी सहायक समाजकल्याण आयुक्तांकडे पाठविणे, न.प.तील जनरेटरची त्रिवार्षिक देखभालीसाठी कंत्राटी सेवा पुरविणे, डम्पिंगवर विद्युतीकरण, आठवडी बाजार विकास आदी ठराव आहेत.मंगळवारा भागात शेतकी भवन उभारणे, जिल्हाधिकारी निवासस्थान ते अकोला हायवेपर्यंत डांबरीकरण आदी ठरावही घेण्यात आले आहेत. तर काही ठराव रद्दही केल्याचे सांगितले जात आहे.