लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील गांधी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्तानतर्फे १९ फेबु्रवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता महाआरतीचा कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थितांना खा. राजीव सातव यांनी मार्गदर्शन केले.यावेळी, खा.सातव म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही केवळ चार भिंतीत किंवा एखाद्या शासकीय जागेत साजरी न करता सर्वसामान्य जनतेत साजरी करावी. अखंड भारतात ज्यांची जयंती साजरी होते, असा हा राजा आहे. सामान्यांच्या या राजाची जयंती हा सामान्यांचाच उत्सव आहे, असेही ते म्हणाले.तर शिवप्रतिष्ठानतर्फे दरवर्षी होणाºया कार्यक्रमास त्यांनी सुभेच्छा देत सर्व मावळ्यांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमात जयजयराम शिंदे पाटील जवळेकर यांचे ‘आवाज मराठी मनाचा’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी व्याख्यानातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचिरित्रांवर प्रकाश टाकत अनेक उदाहरणे दिली.यावेळी आ. संतोष टारफे , संजय बोंढारे, दिलीप चव्हाण, बाबा नाईक, रामरतन शिंदे, डॉ. संजय नाकाडे, शामराव जगताप, शिवाजी मस्के, डॉ. भालेराव, डॉ. श्रीधर कंदी, राजू महाराज, संतोष भिसे, विलास गोरे आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी विजय शिंदे, विजय पाटील, गोपाल चव्हाण, माजिद खान, नागेश उबाळे, संतोष मोहोरे, रवि घाडगे, महेश काळे, विनोद गोरे, अविनाश माने, गणेश जाधव, सचिन झाडे, आकाश गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.
शिवप्रतिष्ठानतर्फे महाआरती कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 01:17 IST