शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मग्रारोहयोत जनजागृती करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:30 IST

जिल्ह्यात मग्रारोहयोच्या कामांची माहिती व्हावी, मजूर उपस्थिती वाढावी यासाठी आता जनजागृतीसाठी रंगरंगोटीची कामे हाती घेतली जाणार आहेत. ज्या भागात मग्रारोहयोत मोठ्या प्रमाणात झाली अशा ठिकाणी हे काम होणार आहे. सध्या १४३ कामांवर ८८४ मजुरांची उपस्थिती होती.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मग्रारोहयोच्या कामांची माहिती व्हावी, मजूर उपस्थिती वाढावी यासाठी आता जनजागृतीसाठी रंगरंगोटीची कामे हाती घेतली जाणार आहेत. ज्या भागात मग्रारोहयोत मोठ्या प्रमाणात झाली अशा ठिकाणी हे काम होणार आहे. सध्या १४३ कामांवर ८८४ मजुरांची उपस्थिती होती.यंदा दुष्काळी स्थिती असतानाही मग्रारोहयोच्या कामांवर फारशी मजूर उपस्थिती नाही. मग्रारोहयोच्या कामांवर कमी मजुरी मिळण्याच्या कारणाने मजूर इतर कामांकडे वळतात. ऊसतोड, बांधकामाची कामे केल्यास अधिकची मजुरी मिळते. त्यामुळे या मजुरांचा ओढा या कामांकडेच दिसतो. त्यामुळे स्थलांतर होते. आता बहुतांश भागातील मजुरांनी स्थलांतर केले. रबीची पेरणीही कमीच प्रमाणात होणार असल्याने अनेक शेतकऱ्यांनाही मग्रारोहयोतून शेतीतील कामे करणे शक्य आहे. शिवाय स्थलांतर टाळून मुलांच्या शिक्षणाचीही गैरसोय टाळता येणार आहे. त्यामुळे समृद्ध महाराष्ट्रमधील ११ कलमी कार्यक्रमावर भर देवून यातील उद्दिष्टानुरुप कामे होण्यासाठी जनजागृतीपर रंगरंगोटी केली जाणार आहे. यात योजनेची वैशिष्ट्ये, स्वरुप व कामे मागण्याची पद्धत आदी बाबींवर भर राहणार आहे. यावर्षी जिल्ह्याला ९.४१ लाख मनुष्यदिवस रोजगार उपलब्ध करून देण्याचे वार्षिक उद्दिष्ट होते. मात्र सध्याच ९.५३ लाख मनुष्यदिवस रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. या कामांवर आतापर्यंत अकुशलवर १९.७१ तर कुशलवर ५.९५ कोटी असा २७ कोटींचा खर्च झाला आहे. या योजनेत सध्या १७0 कामे सुरू असून केवळ ८८४ मजूर उपस्थिती आहे. यात औंढा तालुक्यात ७ ग्रा.पं.च्या १४ कामांवर ४७, वसमतला ३ ग्रा.पं.च्या ३४ कामांवर २२२, हिंगोलीत १८ ग्रा.पं.च्या ३६ कामांवर २४४, कळमनुरीत १0 ग्रा.पं.च्या ७५ कामांवर २६८, सेनगावात ८ ग्रा.पं.च्या ११ कामांवर १0३ मजुरांची उपस्थिती आहे. दुष्काळी चित्र असल्याने मजूर उपस्थिती वाढीसाठी संधी असतानाही तसे प्रयत्न गावपातळीपासूनच कोणी करीत नसल्याचे दिसून येत आहे. आता जनजागृतीचा कितपत फायदा होईल, हे काळच सांगणार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीGovernmentसरकार