शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: ...अन् अपक्ष उमेदवारानं माघार घेताना शिवसेना उमेदवाराचं बिंग फोडलं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 17:05 IST

अ‍ॅड.शिवाजी जाधव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केल्याने चुरस वाढली होती.

वसमत (जि.हिंगोली) : हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज मागे घेत असलो तरी विधानसभेसाठी मीच उमेदवार राहील असा सुचक इशारा देत अ‍ॅड.शिवाजी जाधव यांनी आज अर्ज मागे घेतला. मात्र यावर स्पष्टीकरण देत असताना सुरुवातीला पाटील यांनीच अपक्ष अर्ज भरण्याचे सुचवले असल्याचा गौप्यस्फोट जाधव यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. 

हिंगोली लोकसभा मतदारसंघात युतीचे हेमंत पाटील आणि कॉंग्रेसकडून सुभाष वानखेडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यातच अ‍ॅड.शिवाजी जाधव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केल्याने चुरस वाढली होती. त्यांच्या उमेदवारीवर चर्चा करण्यासाठी राज्यमंत्री अर्जून खोतकर, संपर्क प्रमुख आनंद जाधव आणि उमेदवार हेमंत पाटील हे आज वसमत येथे आले होते. तिघांनी अ‍ॅड. शिवाजी जाधव यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. यानंतर जाधव यांनी आपण लोकसभेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. मात्र येणाऱ्या विधानसभेत मीच उमेदवार असणार असे सूचक वक्तव्य केले.  

मुंदडा यांच्या उमेदवारीची सुरुवातीला चर्चा शिवसेनेच्या वतीने डॉ. जयप्रकाश मुंदडा यांना उमेदवारी निश्चित झाल्याची सुरुवातीला चर्चा होती. त्यामुळेच पाटील यांनी अ‍ॅड. जाधव यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहण्याची गळ घातल्याची चर्चा मतदार संघात सुरु झाली होती. मात्र नाट्यमय घडामोडीत सेनेचे तिकीट हेमंत पाटील यांना मिळाले. यामुळे सारे चित्र पालटून ज्यांना उभे रहा म्हणून गळ घातली आता त्यानांच माघार घेण्यासाठी विनंती करावी लागत असल्याचे दिसले. यातून जर डॉ. मुंदडा हे उमेदवार असते तर पाटील यांचा त्यांच्या अपक्ष उमेदवारीस पाठिंबा असता का ? असाच निघत असल्याची चर्चा आहे. 

अ‍ॅड. जाधव यांच्या या वक्तव्यासंदर्भात उमेदवार पाटील यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. जाधव यांना तसे बोलायचे नव्हते असे बोलत त्यांनी वेळ मारून नेली. जाधव ही माहिती उघड करत असतांना सेना संपर्कप्रमुख आनंद जाधव यांची शेजाऱ्यांसोबत कुजबूज झाल्याचेही पहावयास मिळाले. या वरून शिवसेनेतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा समोर आले आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकhingoli-pcहिंगोलीShiv Senaशिवसेना