शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे दीड कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:29 IST

हिंगोली : कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनचा फटका सराफा बाजाराला जास्त प्रमाणात बसला असून, दीड वर्षापासून जवळपास दीड कोटीची ...

हिंगोली : कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनचा फटका सराफा बाजाराला जास्त प्रमाणात बसला असून, दीड वर्षापासून जवळपास दीड कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे. दुसरीकडे हाताला काम नसल्यामुळे बंगाली कारागीरांनीही आपले घर जवळ केले आहे.

२३ मार्च २०२० पासून कोरोना महामारीने सर्वत्र शिरकाव केला. आज दीड वर्ष झाले, तरी कोरोना महामारी संपुष्टात येण्याचे नाव घेत नाही. कोरोना रुग्ण वाढत असल्याचे पाहून शासन वेळोवेळी लॉकडाऊन, संचारबंदी लागू करीत आहे. दरवर्षी नाही म्हटले तरी एक ते दीड कोटींची उलाढाल हिंगोली जिल्ह्यात होत असते. मराठवाड्यातील क्रमांक एकची सोन्याची बाजारपेठ म्हणून हिंगोली जिल्ह्याकडे पाहिले जाते. परंतु, कोरोनामुळे आज सराफा बाजार पूर्णत: बंद झाला आहे. जिल्ह्यात १५०, तर शहरात ५० दुकाने सराफांची आहेत. परंतु, लॉकडाऊनमुळे सर्वच दुकाने आजमितीस बंद आहेत. गतवर्षी शासनाने कोरोना काळात थोडीबहुत सूट दिली होती. परंतु, यावेळेस मात्र दुकाने उघडण्यासाठी अजिबात सूट दिलेली नाही. आमचा लॉकडाऊनला विरोध नाही; पण दुकानांनाही काही प्रमाणात का होईना दुकाने उघडण्यास सूट दिल्यास कारागीरांच्या हाताला काम मिळते. आजमितीस नाही म्हटले तरी जवळपास ३०० कारागीरांची संख्या आहे. परंतु, हाताला काम नसल्यामुळे बंगाली, सांगली, सातारा, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर या भागांतून आलेल्या कारागीरांनी घर जवळ केले आहे.

अक्षय तृतीयाचा मुहूर्त गेला...

साडेतीन मुहूर्तांपैकी मुहूर्त असलेला अक्षय तृतीया हा मुहूर्तही पूर्णत: हातून गेला आहे. अक्षय तृतीयेला मौल्यवान वस्तू घेण्याकडे अनेकांचा कल असतो. पण कोरोनामुळे दुकाने बंद असल्यामुळे त्यावर पाणी फेरले गेले आहे. मोठ्या शहरात सोन्या-चांदीची ऑनलाईन नोंदणी होते. हिंगोली जिल्हा सोने-चांदीबाबत मराठवाड्यात अव्वल असला, तरी ऑंनलाईन नोंदणी मात्र झालेली नाही.

- सुधीरअप्पा सराफा, अध्यक्ष, सराफा असोसिएशन

कारागीरांवर उपासमार...

सोन्या-चांदीचे दागिने बनविणाऱ्या कारागीरांवर दीड वर्षापासून उपासमार येऊन ठेपली आहे. सराफा दुकाने बंद असल्यामुळे अनेकांनी घर जवळ केले आहे. बंगाली कारागीर तर केव्हाच निघून गेले आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतरच ते आता परत येतील. दोन पिढ्यांपासून अशी वेळ कधीच आली नसून, कोरोनामुळे आज उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. शासनाने दुकानांना परवानगी दिल्यास रोजीरोटीचा प्रश्न मिटू शकतो.

- दुर्गादास खर्जुले, सराफा कारागीर