शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही झळकणार करबुडव्यांची यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:29 IST

येथील पालिकेच्या वतीने मागील आठ ते नऊ दिवसांपासून करवसुली मोहिमेसाठी एकूण ११ पथकांची नियुक्ती केली आहे. आतापर्यंत २ लाख ९६ हजार ६४८ रुपये करवसुली झाली आहे. उद्दिष्टांच्या तुलनेत आता झालेली वसुली काहीच नसल्याने पथक वसुलीसाठी जास्तच जोर देत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील पालिकेच्या वतीने मागील आठ ते नऊ दिवसांपासून करवसुली मोहिमेसाठी एकूण ११ पथकांची नियुक्ती केली आहे. आतापर्यंत २ लाख ९६ हजार ६४८ रुपये करवसुली झाली आहे. उद्दिष्टांच्या तुलनेत आता झालेली वसुली काहीच नसल्याने पथक वसुलीसाठी जास्तच जोर देत आहे. एवढे करुनही वसुलीसाठी प्रतिसादच न देणाºया करबुडव्यांची यादी मार्चच्या पहिल्या आठवड्यात चौका- चौकात लावून त्यांच्या घरासमोर बॅण्डही वाजविण्याचा इशारा दिला आहे.पालिकेच्या वतीने करवसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठी एकूण ११ पथके तयार केली आहेत. यामध्ये घटरपट्टीसाठी ७, नळपट्टीसाठी ३ आणि शासकीय वसुलीसाठी १ पथक तयार केले आहे. त्यामुळे यावर्षी करबुडव्यांची जराही गय केली जाणार नाही. तशा सूचनाच पथकांना दिल्या जात आहेत. एवढेच काय तर कर विहित मुदतीत न भरल्यास पालिकेतर्फे कर वसूल करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार असून, मोठ्या थकबाकीदारांच्या नावांची यादीच वर्तमानपत्रात प्रसिद्ध करुन चौका चौकातही लावली जाणार आहे. शिवाय यंदा करबुडव्यांच्या घरासमोर बॅण्डही वाजविण्याबरोबर नळ जोडणीही तोडली जाणार आहे. आतापर्यंत २ लाख ९६ हजार ६४८ रुपयांची वसुली झाली आहे. यामध्ये घरपट्टी १ लाख ९८ हजार ३५३ तर नळपट्टी ९८ हजार २९५ रुपये झाल्याची माहिती मिळाली आहे. वास्तविक पाहता मागील वर्षी ६ कोटी २० लाख रुपये कर वसुलीची मागणी असताना मार्च एण्डपर्यंत ५ कोटी ३६ लाख रुपये वसूल झाले होेते. तर यंदा ५ कोटी ९९ लाख रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट आहे. सध्या १ कोटी ७५ लाख रुपये वसूल झाले आहेत.हे करणार पालिका : बॅण्ड, जप्ती, नळ तोडणीपालिकेतर्फे कर वसुली करण्यासाठी पाहिजे त्या लुप्त्या सुचविल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे नळ जोडणीसाठी तीन पथके तयार केले असून, घर पट्टी दिली नसली तरीही नळ जोडणी तोडली जाणार आहे. नळ पट्टी राहिल्यास तर नळ जोडणी तोडणारच त्याच काहीच शंका नाही. आता पर्यंत १० नळ जोडण्यातोडल्या आहेत. तर काही ग्राहाकांकडून अर्धी- अर्धी वसूली जमा करुन त्यांना १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. तसेच १ मार्च नंतर विविध प्रभागात तंबू टाकून यंदाही वसूली केली जाणार असल्याचे पथक प्रमुख पंडित मस्के यांनी सांगितले.वसुलीसाठी पथके विविध भागात फिरत आहेत. त्याच बरोबर लाऊड्स्पीकरद्वारेही वसुलीचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे कर भरुन पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन सीओ रामदास पाटील यांनी केले.