शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

एकाच संघटनेला राज्याध्यक्ष दोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 23:51 IST

न.प.कर्मचाऱ्यांच्या एकाच नोंदणी क्रमांकावर दोन नावांच्या वेगवेगळ्या संघटना राज्यात कार्यरत झाल्या आहेत. त्या दोन्हींचेही अध्यक्ष हिंगोली नगरपालिकेतच काम करणारे असून यावरून चालू असलेल्या शीतयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : न.प.कर्मचाऱ्यांच्या एकाच नोंदणी क्रमांकावर दोन नावांच्या वेगवेगळ्या संघटना राज्यात कार्यरत झाल्या आहेत. त्या दोन्हींचेही अध्यक्ष हिंगोली नगरपालिकेतच काम करणारे असून यावरून चालू असलेल्या शीतयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत, संवर्ग कर्मचारी संघटनेच्या राज्याध्यक्षपदी हिंगोली येथील विश्वनाथ घुगे हे आहेत. मात्र तीन ते चार महिन्यांपूर्वी अचानक याच संघटनेशी नामसाधर्म्य असलेली व महापालिकेसह न.प. कर्मचारी संघटनेची राज्य कार्यकारिणी हिंगोली येथील कर्मचारी डी.पी.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर झाली आहे.या नवीन संघटनेने आमचाच नोंदणी क्रमांक वापरून शासन व कर्मचाºयांची दिशाभूल करण्याचा प्रकार चालविला असल्याची तक्रार विश्वनाथ घुगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. परभणी येथील एका कर्मचाºयांनी न.प. असताना या संघटनेची नोंदणी केली होती.आता तेथे महापालिका झाली व सदर कर्मचारीही सेवानिवृत्त झाला. शासनाने एक-दोनदा पत्रव्यवहार केला म्हणून त्यांना संस्थापक अध्यक्षही म्हणता येत नाही, असेही तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून कुणालाही हा नोंदणी क्रमांक वापरता येणार नाही. शिवाय एवढ्या दिवसांपासून आम्हाला या संघटनेच्या नावासाठी कुणी विरोध केला नाही. तर १४ जुलैला २0१८ रोजी वार्षिक सभेत कार्यकारिणी निवड झाली. त्यामुळे बेकायदेशीर संघटना चालविणाºयांवर शासनाने कठोर कारवाई करण्याची मागणीही घुगे यांनी केली आहे. याबाबत काय निर्णय होणार ते लवकरच कळणे अपेक्षित आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीMuncipal Corporationनगर पालिका