शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एनएसपी पोर्टलवरील नोंदणीकडे ३१२ शाळांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:30 IST

केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्यावतीने अल्पसंख्याक मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत शासकीय वा खासगी शाळेत इयत्ता पहिली ...

केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्यावतीने अल्पसंख्याक मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत शासकीय वा खासगी शाळेत इयत्ता पहिली ते दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असणे आवश्यक असून, मागील वर्षात विद्यार्थ्यांनी ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातही ही योजना शाळांमार्फत राबविली जाते. २०२१-२२ मध्येही अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे नियोजन शासनाने आखले आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज पडताळणी, अर्ज व्हेरिफाय करणे, अर्ज अंतिम करणे, आदी कामे शाळांमार्फत केली जातात. यासाठी शाळांना एनएसपी पोर्टलवर शाळा नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्यातील जवळपास ३१२ शाळांनी जुलैअखेरपर्यंत एनएसपी पोर्टलवर केवायसी रजिस्ट्रेशन अर्ज भरलेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शाळांनी अल्पसंख्याक मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्यासाठी एनएसपी पोर्टलवर केवायसी शाळा नोंदणी किंवा अपडेट करून घ्यावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

केवायसी रजिस्ट्रेशन फाॅर्म भरणे आवश्यक

ज्या शाळेत एकही अल्पसंख्याक विद्यार्थी नाही, अशा शाळांनासुद्धा केवायसी रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे अनिवार्य आहे. तालुक्यातील एकही शाळा केवायसी रजिस्ट्रेशन फाॅर्म भरण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, यासंदर्भात शिक्षणाधिकारी पी. बी. पावसे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

एनएसपी पोर्टलवर नोंदणी न केलेल्या शाळांची संख्या

तालुका शाळांची संख्या

हिंगोली ७९

सेनगाव ६०

वसमत ५७

कळमनुरी ६१

औंढा ५५

एकूण ३१२