शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सुकळीविर शिवारात बिबट्याचे ठसे; वनविभाग आणि ग्रामस्थांनी दिवसभर घेतला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 14:31 IST

Leopard footprints in Suklivir Shivara : वनविभागाच्या माहितीनुसार साेमवारी रात्रीच्या सुमारास बिबट्या या परिसरातून निघून गेला

ठळक मुद्देबिबट्या हा प्राणी एका जागी जास्त वेळ थांबत नाही. गावकरी व परिसरातील शेतकऱ्यांनी घाबरू नये परंतु सतर्कता बाळगावी.

डोंगरकडा ( हिंगोली ) : वारंगा परिमंडळातीळ सुकळीविर बीट शिवारात ७ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास अंकुश धुमाळे यांनी शेतात बिबट्या आढळून आल्याची माहिती गावकऱ्यांना सांगितली. दिवसभराच्या शाेधानंतर साेमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास बिबट्या निघून गेला असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.

सुकळीविर परिसरात बिबट्या दिसून आल्याची माहिती गावकऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक, वनपाल ज्ञानेश्वर मुंढे यांना भ्रमणध्वनीवरून सांगितले. यानंतर वनपाल मुंढे व वनरक्षक संतोष कचरे हे सुकळीविर शिवारात दाखल झाले. गावकरी व शेतकऱ्यांशी चर्चा करून परिसरातील पाहणी केली. यादरम्यान शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले. यावरून बिबट्याचा शोध घेतला असता, तो या परिसरातील एका उसाच्या फडात लपून बसला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या शिवारातील शेतकरी व मजुरांना येथून घरी जाण्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.

बिबट्या हा प्राणी एका जागी जास्त वेळ थांबत नाही. गावकरी व परिसरातील शेतकऱ्यांनी घाबरू नये परंतु सतर्कता बाळगावी. बिबट्या दिसल्यास त्याची तत्काळ द्यावी. आखाड्यावरील पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.  परिसरात वनविभागाचे वनरक्षक संतोष कचरे परिसरात गस्त घालून पाहणी केली. मात्र बिबट्या आढळून आला नाही. नंतर ७ जूनच्या रात्री ९.३० वाजेच्या सुमारास बिबट्या सुखरूप निघून गेला असल्याचे वनपाल मुंढे यांनी सांगितले.

टॅग्स :leopardबिबट्याHingoliहिंगोलीforest departmentवनविभाग