शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेआडून विधानसभेची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:05 IST

लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी जोर धरू लागली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सहा लोकसभा मतदारसंघात युती व आघाडीचा धर्म पाळतच पुढील विधानसभेची तयारीही सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी जोर धरू लागली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सहा लोकसभा मतदारसंघात युती व आघाडीचा धर्म पाळतच पुढील विधानसभेची तयारीही सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.हिंगोली लोकसभा मतदारसंघात हिंगोलीसह कळमनुरी, वसमत, हदगाव, किनवट व उमरखेड हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. हिंगोलीमध्ये मागच्या वेळी भाजपचे तान्हाजीराव मुटकुळे यांनी विधानसभेत बाजी मारली. १९९८ ला काँग्रेस व त्यानंतर सातत्याने सेनेला आघाडी आहे. मात्र विधानसभेत काँग्रेस बाजी मारत आला. मागच्यावेळी काँग्रेसचे भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा पराभव झाला. यावेळी पुन्हा मुटकुळे व गोरेगावकर हे लोकसभेच्या निमित्ताने आपापल्या उमेदवारांसाठी मैदानात उतरून विधानसभेची रंगीत तालीम खेळण्याच्या तयारीत दिसत आहेत. तर ही जागा काँग्रेसला सुटणार असली तरीही राकाँचे दिलीप चव्हाण हेही प्रचारात मागे नाहीत. वसमतमध्येही मागच्या लोकसभेला सेनेला आघाडी होती. विधानसभेतही सेनेचे डॉ.जयप्रकाश मुंदडा यांनी बाजी मारत राकाँचे जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव केला होता. युती व आघाडीत आता हे दोघेही पुन्हा विधानसभेच्या तयारीसाठी लोकसभेच्या प्रचारात कसर सोडणार नसल्याचे दिसत आहे. या मतदारसंघात भाजपचे शिवाजी जाधव व काँग्रेस अ.हाफिज हेही सक्रिय असून आघाडी व युतीचा धर्म पाळत आहेत. जाधव यांनी लोकसभेला उभे राहून बंडखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र माघार घेतली.कळमनुरी मतदारसंघातही काँग्रेसचे आ.संतोष टारफे व शिवसेनेचे संतोष बांगर हे आपापल्या लोकसभा उमेदवारांसाठी आपली विधानसभा निवडणूक असल्याचे समजून झटत आहेत. मागच्या वेळी सेनेकडून पराभूत माजी आ.गजानन घुगे हेही सेनेच्या प्रचारात आहेत.हदगाव विधानसभा मतदारसंघातीलच सुभाष वानखेडे हे लोकसभा लढवत असल्याने काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर पुढे त्यांचा फायदा होणार असल्याने जोरात कामाला लागले. शिवाय सेनेचे आ.नागेश पाटीलही हेमंत पाटील यांच्यासाठी प्रयत्न करून विधानसभेची वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न करीत आहेत.किनवटमध्ये मागील पंधरा वर्षांपासून सातत्याने विजयी होणारे प्रदीप नाईक यांनी काँग्रेस उमेदवारासाठी प्रचार सुरू केला आहे. तर शिवसेना-भाजपची स्थानिक नेतेमंडळी हेमंत पाटील यांच्यासाठी कामाला लागली आहे. उमरखेडमध्येही आ.राजेंद्र नगरधने हे हेमंत पाटील यांच्या उमेदवारीपासून सक्रिय झाले असून माजी आ.विजय खडसे हेही वानखेडेंसाठी तेवढेच प्रयत्न करताना दिसत आहेत.लोकसभा निवडणुकीतील विजय महत्त्वाचाच आहे. मात्र त्यापेक्षाही पुढील विधानसभेसाठी आपलीही तयारी होण्यासाठी प्रत्येक विधानसभा इच्छुक स्वत:हून खांद्यावर प्रचाराची धुरा घेत आहे. कार्यकर्त्यांनाही इमानेइतबारे कामाला लागण्याचा सल्ला देत आहेत. मात्र जेथे कुठे नाराजी आहे, तेथेही काम तर सुरू आहे. मात्र ते स्वत:साठी की लोकसभेच्या उमेदवारासाठी हे कळायला मार्ग नाही. निदान आपला चेहरा लोकांना दाखवण्यासाठी तरी ही मंडळी कामाला लागल्याचे दिसत आहे. बहुतांश जणांनी हीच शक्तीपरीक्षा असल्याचे समजून हाती कमान घेतली. मात्र काहींनी विधानसभेलाच काय ती परीक्षा व्हायची ते होऊन जाईल. आता केवळ तोंडओळख होण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.मागच्या लोकसभेला विधानसभेची तयारी करणाऱ्या काहींनी आपल्याच पक्षाच्या उमेदवाराशी दगाफटका केला. तर काहींनी इमानेइतबारे कामही केले. मात्र मोदी लाटेत शिवसेनेला येथील जागा राखता आली नाही. या मतदारसंघातील सर्वच जागा त्यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. आता परिस्थिती बदलली. दोन भाजप, दोन शिवसेना, एक काँग्रेस तर एक राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे मागच्या निवडणुकीवरून बोध घेवून यावेळी प्रत्येकाला आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची चांगली संधी आहे. तर कार्यकर्त्यांनाही तशी संधी आहे.मागच्या लोकसभेला अनेकांनी उघडच विरोधाची भूमिका घेतली होती. यावेळी मात्र तशा मूडमध्ये कोणीच दिसत नाही. आता ही बाब परवडणारी नसल्याचे सर्वांच्याच लक्षात आले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण