शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

२८,२९ जानेवारीला होणार सरपंच पदाची आरक्षण सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:30 IST

ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारीला निवडणूक झाली, तर १८ जानेवारीला मतमोजणी झाली. यातून तब्बल ४०३५ सदस्य निवडून आले. मात्र, यापूर्वी झालेली ...

ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारीला निवडणूक झाली, तर १८ जानेवारीला मतमोजणी झाली. यातून तब्बल ४०३५ सदस्य निवडून आले. मात्र, यापूर्वी झालेली आरक्षण सोडत रद्द झाल्याने ग्रामपंचायत सदस्यांची धाकधूक वाढली होती. कोणत्याही प्रवर्गाला आरक्षण सुटले, तर आपल्याकडे त्या प्रवर्गाचा सदस्य असावा यासाठी संपूर्ण पॅनेलच कसे निवडून येईल याकडे पॅनेलप्रमुखांची कसोटी लागली होती. अखेर पाच वर्षांसाठीच्या काळासाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यासाठी त्या त्या तालुक्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुला प्रवर्ग यातील महिला आरक्षण निश्चित करण्याबाबतचे अधिकार तहसीलदार यांना त्यांच्या कार्यक्षेत्रापुरते प्रदान करण्यात आले आहे. त्यानुसार २८ जानेवारीला दुपारी १२ वाजता सेनगाव, वसमत, कळमनुरी या तालुक्याचे आरक्षण सोडत होणार आहे, तर २९ जानेवारीला हिंगोली, औंढा नागनाथ या तालुक्यांतील सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून त्या त्या तहसीलचे तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संपर्क अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली असून, सेनगाव व हिंगोली तालुक्यांसाठी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांची वसमत व औंढा नागनाथ, तर उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चुरशीच्या झाल्या लढती

ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला आरक्षण सोडत जाहीर झाली होती. त्यामुळे आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतीत लक्षवेधी लढती होणार नसल्याचे राजकीय जाणकार म्हणत होते. मात्र, ही आरक्षण सोडत रद्द झाल्याचे आदेश निघाल्यानंतर पुन्हा सर्वच जण निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. पॅनेलप्रमुखांनी सर्वच उमेदवार निवडून कसे येतील याकडे लक्ष दिले.