शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

लिगोसाठी ९ जानेवारीला अंतिम बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:08 IST

औंढा नागनाथ तालुक्यात प्रस्तावित असलेल्या लिगो इंडिया प्रकल्पासाठी आता ९ जानेवारीला विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे अंतिम बैठक होणार आहे. यात विविध बाबींचा मुद्देनिहाय आढावा घेतला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यात प्रस्तावित असलेल्या लिगो इंडिया प्रकल्पासाठी आता ९ जानेवारीला विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे अंतिम बैठक होणार आहे. यात विविध बाबींचा मुद्देनिहाय आढावा घेतला जाणार आहे.लिगो इंडिया या गुरुत्वाकर्षण लहरींचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी होत असलेल्या प्रयोगशाळेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ही प्रयोगशाळा जगातील तिसरी प्रयोगशाळा ठरणार आहे. ही जागा अंतिम झाल्यानंतर जमीन हस्तांतरणाची मोठी प्रक्रिया पार पडली आहे. आता इतर बाबींची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यात अडसर न येण्यासाठी ९ जानेवारीला विभागीय आयुक्तांनी बैठकीचे आयोजन केले आहे. यात संयुक्त मोजणी पिलर्सचे काम, हिंगोली तालुक्यातील जामवाडी येथील जमीन, नांदेड तालुक्यातील वसरणी येथील जमीन, वनजमीन, विविध कामांसाठीचा निधी आदीबाबत आढावा घेण्यात येणार आहे. तर लिंबाळा येथील वीज केंद्र, सिद्धेश्वर धरणावरून पाणीपुरवठा योजना, जामवाडीत रस्ता, बोरजा ते दुधाळा रस्ता आदी बाबींचाही आयुक्त आढावा घेणार आहेत. यातील काही कामे पूर्ण झाली असली तरीही काही कामे मात्र अजून पूर्ण होणे बाकी आहे. बैठकीनंतर गती मिळू शकेल.जिल्ह्यासाठी ही प्रयोगशाळा अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे खगोल शास्त्रज्ञांची या भागात रेलचेल वाढणार आहे. त्याचा या भागातील विद्यार्थ्यांनाही फायदा होणार आहे. शिवाय इतरही अनेक दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. औंढा नागनाथ हे तीर्थक्षेत्र म्हणून आधीच प्रसिद्ध आहे. त्यात आता हा नवा प्रकल्प सोबतीला आल्याने या क्षेत्रालाही महत्त्व येणार आहे. या प्रकल्पाचे काम आता येत्या काही दिवसांत सुरू होण्याची चिन्हे दिसू लागल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीRevenue Departmentमहसूल विभाग