शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादित जमिनीच्या ८९0 सातबारा प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:50 IST

जिल्ह्यात अजूनही ८९0 भूसंपादनाच्या सातबारांवर शासकीय मालकीचा उल्लेख झालाच नसल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी याबाबत संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठ्यांनी ही बाब मनावर घेण्यास सांगितल्यानंतर केवळ १७१ सातबारांवर अशी नोंद झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात अजूनही ८९0 भूसंपादनाच्या सातबारांवर शासकीय मालकीचा उल्लेख झालाच नसल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी याबाबत संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठ्यांनी ही बाब मनावर घेण्यास सांगितल्यानंतर केवळ १७१ सातबारांवर अशी नोंद झाली आहे.हिंगोली जिल्हा स्थापनेपासूनच नव्हे, त्यापूर्वीही भूसंपादित झालेल्या विविध प्रकल्पांसाठीच्या जमिनीचा मावेजा संबंधित लाभार्थ्यांना अदा झाला आहे. मात्र ही जमीन संबंधित शासकीय विभागाच्या नावाने अद्याप झाली नाही. यात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी अथवा तलाठी अशा कोणीच पुढाकार घेतला नाही. अनेक ठिकाणी तर संबंधित विभागानेच याबाबत कोणतीच कारवाई केली नसल्याने या बाबी रखडून पडल्याचे समोर आले आहे.मात्र आता या सर्व जमिनी संबंधित शासकीय विभागाच्या नावे करण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी पुढाकार घेत आदेश दिले आहेत. या कामाला तरीही म्हणावी तशी गती येताना दिसत नाही. जिल्ह्यात १0६१ भूसंपादन प्रकरणे आहेत. तर यापैकी केवळ १७१ प्रकरणांत सातबारा अद्ययावत झाल्या आहेत.मात्र अजूनही ८९0 प्रलंबित आहेत. यात हिंगोलीतील १९६ पैकी १६७, कळमनुरीत ४६६ पैकी ४२७, सेनगावात १0३ पैकी ८0, औंढ्यात ११९ पैकी ९५, वसमतला १७७ पैकी १२१ सातबारांचे काम अजूनही प्रलंबित आहे.आणखी काही प्रकल्प शिल्लकचसध्या काम सुरू असलेल्या सातबारांपेक्षाही जास्त सातबारा प्रलंबित आहेत. मात्र या प्रकल्पांची माहितीच जमा करण्याचे काम सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यात सिंचनाचे लघुप्रकल्प २६ असून त्यासाठीही जमीन संपादित झाली आहे. त्यांच्या सातबाराची माहितीही गोळा करण्याचे काम आता सुरू झाले आहे. या वेगळ्या सातबारा राहणार आहेत. याबाबतही नुकत्याच सूचना देण्यात आल्या आहेत.संबंधित विभागच गाफिलमहसूल विभागाने सातबारावर शासकीय नोंदी करण्याचे काम सुरू केले असले तरीही या सातबारा आपल्या विभागाच्या नावाने करण्याची जबाबदारी जमीन संपादित करणाऱ्या विभागानेही घेतली पाहिजे. मात्र ते गाफिलच आहेत.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीLand Roverलँड रोव्हर